बीड सरपंच हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करा
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली सभागृहात मागणी
नागपूर (कटूसत्य वृत्त):- बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज 289 अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली.
या गंभीर हत्येत राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मीक कराड यांचा सहभाग असल्याची येथील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही दानवे यांनी आज परिषद सभागृहात केली.
आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री यांनी दिले.
0 Comments