परभणीतील पोलीस अत्याचार आणि कस्टडीतील दलित तरुणाच्या हत्येबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना अटक करा -आडम मास्तर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 16, 2024

परभणीतील पोलीस अत्याचार आणि कस्टडीतील दलित तरुणाच्या हत्येबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना अटक करा -आडम मास्तर

 परभणीतील पोलीस अत्याचार आणि कस्टडीतील दलित तरुणाच्या

 हत्येबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना अटक करा -आडम मास्तर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-परभणी येथे बंदच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अतिरेकी रानटी कारवाईत अनेक निरपराध नागरिकांवर जाणूनबुजून अत्याचार करण्यात आले. सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा कोठडीत पोलिसांनी केलेल्या निर्घृण मारहाणीत मृत्यू झाला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, मृताच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करा आणि कुटुंबातील एका व्यक्तीला कायम शासकीय सेवेत सामावून घ्या अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षचे नेते आडम मास्तर यांनी केली  

त्याचबरोबर कोम्बिंग ऑपरेशनच्या नावे दलित वस्त्यांमध्ये घुसून महिलांसकट निरपराध नागरिकांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर, त्यांना तसा आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, दलित नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशीही मागणी हि केली संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि नंतर दलितांवर करण्यात आलेल्या पोलीस अत्याचारास परभणीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

भाजप-प्रणित महायुतीचे नव्या पेशवाईचे भ्रष्ट सरकार राज्यात आरूढ झाल्यावर लगेच प्रशासनातील मनुवादी मुजोर झाल्याचेच या घटना निदर्शक आहेत. राज्य शासन आणि प्रशासनाच्या या जातीय वृत्तीचा माकप निषेध करत असून जनतेने रस्त्यावर उतरून संविधानाच्या मार्गाने आपला संताप व्यक्त करावा, असे आवाहन करत आहे. त्यानुसार माकप ने शेकडो कामगारांना घेऊन १४ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शने करण्यात आलेले आहे. याबाबत भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल.असे आडम मास्तर म्हणाले 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages