नेताजी शिक्षण संस्थेत वक्तृत्व व श्लोक पाठांतर स्पर्धा उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 16, 2024

नेताजी शिक्षण संस्थेत वक्तृत्व व श्लोक पाठांतर स्पर्धा उत्साहात

 नेताजी शिक्षण संस्थेत वक्तृत्व व श्लोक पाठांतर स्पर्धा उत्साहात




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री ष ब्र.योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संस्थेत वक्तृत्व व श्लोक पाठांतर स्पर्धा उत्साहात पार पडले. स्पर्धेचे उदघाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर,सुभाष धुमशेट्टी,विजयकुमार हुल्ले,दानय्या मठपती, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशूले, धर्मराज बळ्ळारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धा सहा गटात तर श्लोक पाठांतर स्पर्धा चार गटात घेण्यात आले .१८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
वक्तृत्व स्पर्धेचे बाह्यपरीक्षक म्हणून अनंता बावधनकर ( सहशिक्षक मुस्ती शाळा), सागर देशमाने(संत ज्ञानेश्वर मराठी विद्यालय),रंगसिद्ध कोरे 
(मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा),प्रा.लक्ष्मी कुरापाटी(कस्तुरबा कॉलेज ऑफ एज्युकेशन),अभिज भानप(सहशिक्षक मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशाला जुना वीडी घरकुल),बसवंत पाटील   (शहा - कोठारी प्रशाला कुमठा नाका),श्लोक पाठांतर स्पर्धेचे परीक्षक म्हणून मीनाक्षी शेटे, सुप्रिया वडेयर आदींनी तर अंतर्गत परीक्षक लक्ष्मण कांबळे, शीतल पाटील, भारती पाटील , प्रियंका खिलारे, हणमंत कुरे, बसवराज बिराजदार, विश्वनाथ तंबाके, काशिनाथ माळगोंडे , गणपती पाटील व शिवानंद पुजारी यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बत्तुल यांनी केले तर विश्वराध्य मठपती यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages