सोलापूर जिल्हयामध्ये राष्ट्रिय लोकअदालत यशस्वीपणे संपन्न. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 16, 2024

सोलापूर जिल्हयामध्ये राष्ट्रिय लोकअदालत यशस्वीपणे संपन्न.

 सोलापूर जिल्हयामध्ये राष्ट्रिय लोकअदालत यशस्वीपणे संपन्न.



 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे दि. 14 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये चौथे राष्ट्रिय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालत सोलापूर जिल्हयातील एकुण 19831 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. लोकअदालतीच्या माध्यमातून एकुण रक्कम रु. 71,05,14,605/- इतके मुल्य असणा-या प्रकरणांमध्ये सांमजस्याने तडजोड करण्यात आली.

चौथ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन सलमान आझमी, अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश  जे. जे. मोहिते, जिल्हा सरकारी वकिल अॅड. प्रदिपसिंग रजपूत, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अमित आळंगे, सोलापूर महानगरपालिका उपायुक्त  आशिष लोकरे, सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री. सुधीर खिराडकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक  राजन माने, भारतीय स्टेट बँकेचे वरिष्ठ शाखाधिकारी  अनिकेत फले, विधीज्ञ  व्ही. एन. देशपांडे आणि जिल्हा न्यायालय प्रबंधक  पल्लवी पैठणकर, विधीज्ञ, पक्षकार आधी उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्हयातील सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आले. राष्ट्रिय लोकअदालत मध्ये 44201 प्रलंबित प्रकरणे, दाखलपुर्व 94525 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी प्रलंबित 5062 प्रकरणांमध्ये तडजोड झाली आणि 14769 दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीच्या पार्श्वभुमिवर निकाली काढण्यात आली.

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये सोलापूर मुख्यालयाच्या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश  जे. जे. मोहिते, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर  आर. यु. नागरगोजे, दिवाणी न्यायाधीश,  एस. ए. आर. सैयद, दिवाणी न्यायाधीश, पी. पी. पेठकर, दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी  डी. डी. कोळपकर, न्यायदंडाधिकारी  पी. व्ही. चव्हाण, न्यायदंडाधिकारी  एस. पो. मर्डेकर, न्यायदंडाधिकारी  व्ही. व्ही. रजपूत कुलकर्णी, न्यायदंडाधिकारी  एस. पी. पाटील, न्यायदंडाधिकारी  व्ही. एम. रेडकर, न्यायदंडाधिकारी  व्ही. पी. कुंभार यांनी काम पाहिले. पॅनल सदस्य म्हणून लोकअभिरक्षक कार्यालयातील लोकरक्षक स्नेहल राऊत, एस. एम. झुरळे, एम. बी. सोलनकर, रेवण पाटील, जी. बी. नवले तसेच व्ही. व्ही. कुर्ले,  डी. व्ही. किणगी,  एस. आर. शेंडगे आदींनी काम पाहिले.

चौथे राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्याकरीता पोलीस आयुक्त  एम. राजकुमार, पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त  विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिका आयुक्त  शितल तेली उगले, उपायुक्त  आशिष लोकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता सुनिल माने, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त  सुधीर खिराडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त  राजन माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायालय, सोलापूर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

स्पेशल ड्राईव्ह -

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजनापूर्वी दि. 09 डिसेंबर 2024 ते दि. 13 डिसेंबर 2024  या कालावधीमध्ये सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. विशेष मोहिमेमध्ये 40 वर्षे जुनी 02,  30 वर्षे जुनी 3,   20 वर्षे जुनी 1,   15 वर्षे जुनी 24,     10 वर्षे जुनी 128,  5 वर्षे जुनी 880 व इतर अशी एकुण 3300 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

लोक न्यायालयाची यशस्वी गाथा-

लोक अदालत दि. 14 डिसेंबर 2024 रोजी पॅनल कमांक 1 मध्ये एकूण 32 प्रकरणांची यशस्वी तडजोड झाली. विशेषतः एल.ए. आर. 103/2020  हे प्रकरण दि. 15 डिसेंबर 2020 रोजी दाखल होवून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 या न्यायालयात प्रलंबित होते. सदर प्रकरण हे रु. 1,32,93000/- या रक्कमेवर तडजोड झाली. सदर प्रकरणामध्ये एकूण 15 प्रतिवादी होते त्यांच्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक हिश्यांच्या वाटणीसाठी बराच काळ प्रकरण प्रलंबित होते. सदर प्रकरण हे लोक न्यायालयाकडे सादर करण्यात आले. सदर प्रकरण हे लोक न्यायालयामध्ये तडजोड होवून सर्व प्रतिवादींनी भूसंपादन संदर्भ कमांक १०३/२०२० ची तडजोड रक्कम रु. 1,32,93000/- त्यांच्या सहमतीने केलेल्या हिश्यांच्या प्रमाणात विभागणी झाली.

 एम. पी. एस. सी. स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा तरूण व त्याच्या पत्नी मध्ये गैरसमजातून झालेल्या वादाचे रूपांतर 9 महिने एकमेकांपासून वेगळे राहण्यात झाले व परिणामी घटस्फोटापर्यंत येवून ठेपलेल्या प्रकरणात समूपदेशनाने व समोपचाराने केलेला प्रयत्नाला यश आले. यात दोघांनी त्यांच्या मुलीचे भविष्य व स्पर्धा परिक्षेकरिता लागणारे तणाव मुक्त वातावरण याचा सखोल विचार करून एकत्र येण्याचा निर्णय घेवून एकमेकांविरूद्धचे सर्व वाद व अर्ज लोक अदालत मध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.

 शेतकरी पती व गृहीणी असलेली पत्नी व तीन अपत्ये जे सुमारे चार वर्षांपासून किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकमेकांपासून विभक्त राहत होते. समूपदेशानाने व समोपचाराने त्यांच्यात मनोमिलन घडवून त्यांच्या व त्यांच्या मूलांच्या भविष्याचा विचार रूजवील्याने त्यांनी सारासार विचार करून एकमेकांविरूद्धचे सर्व हेवे दावे लोक अदालत मध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.

 

 सुमारे सात वर्षांपूर्वी झालेल्या एका उच्च शिक्षित डॉक्टरेट प्राप्त प्राध्यापकाचे झालेले लग्न. वैचारिक मतभेदातून ते पती-पत्नी विभक्त राहिले. समूपदेशानाने व समोपचाराने त्यांच्यात मनोमिलन घडवून त्यांच्या भविष्याचा विचार रूजवील्याने त्यांनी सारासार विचार करून एकमेकांविरूद्धचे सर्व अर्ज व दावे लोक अदालत मध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.

 ठाणे स्थित कॉपॅरिट क्षेत्रातील पती व गृहीणी असलेली पत्नी जे सुमारे एक वर्षांपासून शुल्लक कारणावरून एकमेकांपासून विभक्त राहत होते समूपदेशानाने व समोपचाराने त्यांच्यात मनोमिलन घडवून भविष्याचा विचार रूज्वील्याने त्यांनी सारासार विचार करून एकमेकांविरूद्धचे सर्व हेवेदावे लोक अदालत मध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.

या सर्व प्रकरणांमध्ये मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  एम. एस. आझमी साो, मा. मा. प्रमुख कौटुंबिक न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. घारगे साो, मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जे.जे. मोहिते साो व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मा. सचिव  उमेश देवर्षी साो यांच्या प्रयत्नाला यश आले सदर लोक अदालतीच्या सर्व यशस्वी प्रकरणांमध्ये सहभाग घेतलेल्या पक्षकारांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अशी माहिती अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांनी दिली आहे.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages