५४ मीटर रस्ता आणि महत्त्वपूर्ण प्रकल्प लवकरच मार्गी! , सोलापूर विकास मंचच्या प्रयत्नांना यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 3, 2024

५४ मीटर रस्ता आणि महत्त्वपूर्ण प्रकल्प लवकरच मार्गी! , सोलापूर विकास मंचच्या प्रयत्नांना यश

 ५४ मीटर रस्ता आणि महत्त्वपूर्ण प्रकल्प लवकरच मार्गी! , सोलापूर विकास मंचच्या प्रयत्नांना यश

सोलापूर महानगरपालिका सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी यांच्या समवेत बैठक; 

सोलापूर(कटूसत्यवृत्त):-सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी यांच्या समवेत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले.

५४ मीटर रस्ता:

छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटलपर्यंत ५४ मीटर रुंदीचा रस्ता लवकरच साकार होणार आहे. या कामासाठी ३.८२ लाख रुपयांची निविदा लवकरच निघणार असून, सोलापूर विकास मंचच्या पाठपुराव्यामुळे DPDC मधून या कामासाठी तब्बल भरिव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग:

हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यावर १०२ वर्षे जुना दमाणी नगर पुल पाडल्यानंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करता येईल. अप्रोचेसचे एम्बॅकमेंट भराव, खडीकरणाचे दोन स्तर, BUSG व BM च्या दोन स्तरांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.

इतर महत्त्वाचे प्रकल्प:

कंबर तलाव रेल्वे पूल व आसरा रेल्वे पूल यांच्या कामांची गती वाढवण्यासाठी लवकरच एक संयुक्त दौरा आयोजित करण्यात येणार आहे. महानगरपालिका, रेल्वे व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समन्वयाने हे काम शक्य झाले आहे.

स्वच्छता पंधरवडा व QR कोड प्रणालीचे कौतुक:

महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत ०२ ते १७ डिसेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा राबविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. घराघरात QR कोड प्रणाली लागू करण्याच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

हद्दवाढ व अवाढव्य टॅक्सवर चर्चा:

शहराच्या हद्दवाढीबाबत तसेच शहरवासीयांवर लादल्या जाणाऱ्या अवाढव्य टॅक्सच्या मुद्द्यावर नगर विकास विभाग, पालकमंत्री व आयुक्त यांच्यासोबत बैठक लवकरच आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, अॅड. दत्तात्रय अंबुरे, सतिश शेंडे, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages