Hot Posts

6/recent/ticker-posts

गोळ्या घाल्या पण मत पत्रिकेवरच मतदान होणार

 गोळ्या घाल्या पण मत पत्रिकेवरच मतदान होणार



मारकटवाडीकर इरेला पेटले; माळशिरसकडे राज्याचे लक्ष

माळशिरस (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी गावाची सध्या चर्चा आहे. ईव्हीएमवर शंका घेत गावकऱ्यांनी मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदानाला प्रशासनाचा विरोध असून हे उद्या ही प्रक्रिया पार पडू नये यासाठी प्रशासनाने गावात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र गावकरी आपल्या निर्णयावर ठाम असून उद्या होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी..असा इशाराचा ग्रामस्थांनी दिला आहे.
मारकडवाडी मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विजयी झालेले आहेत. परंतु मारकडवाडी गावामध्ये महायुतीच्या राम सातपुतेंनी मोठी मतं मिळवली. त्यामुळे शंका आलेल्या गावकऱ्यांनी तिथे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची तयारी दर्शवली आहे. उद्या 3 डिसेंबरला मारकडवाडी गावात मतदान प्रक्रिया पार पडेल.अशी माहिती ग्रामस्थांनी दिलीय. मात्र प्रशासनाने याला विरोध केला असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच 2 ते 5 डिसेंबर कलम 163 ही लागू करण्यात आले आहे.
गोळ्या घाला, पण मतदान होणारच; गावकरी आक्रमक

बॅलेट पेपरवरील मतदानासाठी त्यांनी गावात प्रचाराला ही सुरुवात केली असून घरोघरी जाऊन मतपत्रिका दाखवत आपण 20 तारखेला ज्याला मतदान केले होते त्यालाच मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांनी कितीही प्रेशर आणलं गोळ्या झाडल्या तरी निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर पार पाडणार अशी जानकर गटाची भूमिका आहे.
गावात काय घडणार? 

जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचे कट कारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80 टक्के मतदान झालेले असताना ईव्हीएममधून वेगळीच आकडेवारी समोर येत आहे. निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मते, तर जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत. या मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवून ईव्हीएमची पोलखोल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. सातपुते यांना मिळालेल्या 843 मतांवर संशय असून, त्यांना गावातून फारतर शे-दीडशे मते मिळायला पाहिजे होती, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आता उद्या या गावात काय घडतंय या कडे सर्वांचे लक्ष लागून राहील आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments