मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रणं - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 3, 2024

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रणं

 मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रणं




 ४० हजार पाहुणे अन् २२ राज्यांचे मुख्यमंत्री येणार

मुंबई (कटूसत्य वृत्त):- महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही मात्र शपथविधी ५ डिसेंबरला होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.
आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे. तसंच एकूण तब्बल ४० हजार निमंत्रितांची उपस्थिती असेल असं सांगण्यात येत आहे. साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याचं महानियोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जवळपास ४० हजारजणांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. देशातील २२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. लाडक्या बहिणींना यासाठी विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे. जवळपास दोन हजार व्हीव्हीआयपींच्या पासेसची यासाठी सोय करण्यात येणार आहे.
कशी असेल आसन व्यवस्था?
आझाद मैदानात १३ विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था असणार आहे. यामध्ये तीन स्टेजची उभारणी केली जाणार आहे. एक मुख्य स्टेज आणि दोन त्याच्या आजूबाजूला छोट्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे. विविध धर्माचे संत-महंत, भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची यात उपस्थिती असेल. संत महंतांसाठी वेगळ्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे. खासदार आणि आमदारांसाठी देखील वेगळी आसनव्यवस्था केली जाणार आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी देखील वेगळी आसन व्यवस्था असणार आहे.
मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची तयारी पण मुख्यमंत्री कोण?
दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याची तयारी सुरु झाली असली तरी मुख्यमंत्री कोण होणार? हे मात्र अद्याप जाहीर झालेलं नाही. त्यामुळं याची देखील उलटसुलट चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? हे जाहीर केलेलं नसल्यानं टीकात्मक विधानं केली जात आहेत. भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित असलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असली तरी भाजपं आयत्यावेळी धक्कातंत्र वापरु शकतो, हेच या उशीर होण्यामागचं कारण ठरु शकतं.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages