एमआयएमची शहर मध्य विधानसभा संघात जबरदस्त कॉर्नर बैठक;सर्व समाजातील मतदारांचा प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 12, 2024

एमआयएमची शहर मध्य विधानसभा संघात जबरदस्त कॉर्नर बैठक;सर्व समाजातील मतदारांचा प्रतिसाद

 एमआयएमची शहर मध्य विधानसभा संघात जबरदस्त कॉर्नर बैठक;

सर्व समाजातील मतदारांचा प्रतिसाद

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- AIMIM सोलापूर शहर मध्यचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी भारत नगर, बेगम पेठ, पाच्छा पेठ येथे जबरदस्त कॉर्नर बैठक घेतली.कॉर्नर बैठकित भारत नगर, बेगम पेठ, पाच्छा पेठ येथील मुस्लिम, दलित, मोची, पद्मशाली,असे सर्व समाजातील मतदार सहभागी झाले होते. भारत नगर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फारुख शाब्दी यांनी पुष्पहार अर्पण केला. कॉर्नर बैठकीत फारुख शाब्दी यांनी महत्वपूर्ण घोषणा केल्या. मी माझ्या माता भगिनींसाठी चार वेगवेगळ्या योजना आणणार आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी भारत नगर, बेगम पेठ, पाच्छा पेठ मधील सर्व मतदारांना विश्वासपूर्ण आश्वासन दिले.आमदार झाल्यावर भारत नगर, बेगम पेठ, पाच्छा पेठ भागातील सर्वांगीण विकास करणार अशी ग्वाही दिली. या बैठकीत AIMIM चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages