पवारांच्या ‘होम मिनिस्टर’नी पूर्ण केला प्रचाराचा पहिला टप्पा! पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रिया पवार मैदानात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 12, 2024

पवारांच्या ‘होम मिनिस्टर’नी पूर्ण केला प्रचाराचा पहिला टप्पा! पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रिया पवार मैदानात

 पवारांच्या ‘होम मिनिस्टर’नी पूर्ण केला प्रचाराचा पहिला टप्पा! पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रिया पवार मैदानात

सोलापूर (कटूसत्यवृत्त):- 251-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सेवू पवार यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी प्रिया पवार यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, त्यांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. प्रिया पवार यांनी घोडा तांडा, कुलकर्णी तांडा, हत्तूर, चंद्रहाळ, वडकबाळ, व्हनमुर्गी, बिरनाळ, राजूर, औराद, सांजवाड आदी गावांमध्ये महिला संवाद दौरा आयोजित केला.

संतोष पवार यांच्या प्रचाराला वेग आला असून, प्रिया पवार यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रचार मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. उन्हातान्हाची पर्वा न करता त्या गावा-गावात जाऊन स्थानिक महिलांशी संवाद साधत आहेत. तसेच, कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मतांची जाण घेत आहेत. 


यावेळी प्रिया पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. "सत्ताधाऱ्यांनी तालुक्यात फक्त स्वतःच्या फायद्यासाठी कारखाने, बँका, खाजगी शाळा स्थापन करून जनतेला विकासाच्या खोट्या आशा दाखवल्या आहेत," असे त्या म्हणाल्या. "सत्ता आणि मंत्रीपदे मिळूनही तालुक्याचा विकास दुर्लक्षित राहिला आहे. आता स्वार्थी राजकारण थांबवण्याची वेळ आलेली आहे. यंदा परिवर्तन घडवण्यासाठी आणि तालुक्यात विकासाची नवी पहाट आणण्यासाठी संतोष पवार यांना विजयी करून तुमची सेवा करण्याची संधी द्या," असे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले.

या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे तसेच मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि स्थानिक महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages