सिनेअभिनेते पवन कल्याण यांचा रोड शो; हजारोंच्या संख्येने सोलापूरकर उपस्थित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 18, 2024

सिनेअभिनेते पवन कल्याण यांचा रोड शो; हजारोंच्या संख्येने सोलापूरकर उपस्थित

 सिनेअभिनेते पवन कल्याण यांचा रोड शो; हजारोंच्या संख्येने सोलापूरकर उपस्थित




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पॉवरस्टार म्हणून ओळखले जाणारे सिनेअभिनेते पवन कल्याण यांनी शनिवारी रोड शो करीत भाजपा आणि म हायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
सुमारे ५ किमी अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या सोलापूरकरांची मने पवन कल्याण यांनी जिंकली.
अक्कलकोट रोड येथील पाणी टाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन होताच उघड्या जीपमध्ये उभे राहिलेल्या अभिनेते पवन कल्याण आणि भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीने फुले उधळून त्यांचे भव्य स्वागत केले. जीपमध्ये उभे राहून त्यांनी नागरिकांना देवेंद्र कोठे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
जय श्रीराम, भारतमाता की जय, वंदे मातरम, जय मार्कंडेया अशा घोषणांनी सर्व रस्ते दुमदुमून गेले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages