महाप्रसाद कार्याने श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव महाराष्ट्र व कर्नाटकसह संपूर्ण देशात पोहचले- निराणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 18, 2024

महाप्रसाद कार्याने श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव महाराष्ट्र व कर्नाटकसह संपूर्ण देशात पोहचले- निराणी

 महाप्रसाद कार्याने श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव महाराष्ट्र व कर्नाटकसह संपूर्ण देशात पोहचले- निराणी




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून सुरू असलेल्या महाप्रसाद कार्याने श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव महाराष्ट्र व कर्नाटकसह संपूर्ण देशात पोहचले असल्याचे मनोगत कर्नाटकाचे माजी मंत्री ना.मुरगेश निराणी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री ना. जगदीश शेट्टर हे उपस्थित होते.


ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत शहाजीभाऊ पवार, सुनील गोरे, नन्नु कोरबू, कांतू धनशेट्टी हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, पुरोहित संजय कुलकर्णी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, निखिल पाटील, गोटू माने, प्रवीण घाडगे, बाळासाहेब घाटगे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, दत्ता माने, तानाजी पाटील, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages