Hot Posts

6/recent/ticker-posts

गावासाठी मंजूर झालेली विकासकामे लवकरात लवकर सुरू होण्यासाठी विजयी करा- सचिन कल्याणशेट्टी अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्रचारार्थ दोड्याळ गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावासाठी मंजूर झालेली विकासकामे लवकरात लवकर सुरू होण्यासाठी महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा कमळाला मत द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. या गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेले अंतर्गत रस्ते, आरोग्यासाठी बंदिस्त गटारे, विविध मंदिरांसमोर सभामंडप बांधणे, गावात येणारे इतर जोडरस्त्यांच्या कामात सुधारणा अशी विकासाची कामे झाली आहेत. याशिवाय काही विकास कामे मंजूर झाली आहेत, ती लवकरच सुरू होतील. यावेळी सौ. विमल गव्हाणे, विलास गव्हाणे. दरेपा बिराजदार, मल्लिकार्जुन करपे, धोंडिबा नडगम, सिद्धाराम पुराणिक, संतोष पुराणिक, गौरीशंकर हलगोदे आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 गावासाठी मंजूर झालेली विकासकामे लवकरात लवकर सुरू होण्यासाठी विजयी करा- सचिन कल्याणशेट्टी 




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्रचारार्थ दोड्याळ गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावासाठी मंजूर झालेली विकासकामे लवकरात लवकर सुरू होण्यासाठी महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा कमळाला मत द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
या गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेले अंतर्गत रस्ते, आरोग्यासाठी बंदिस्त गटारे, विविध मंदिरांसमोर सभामंडप बांधणे, गावात येणारे इतर जोडरस्त्यांच्या कामात सुधारणा अशी विकासाची कामे झाली आहेत. याशिवाय काही विकास कामे मंजूर झाली आहेत, ती लवकरच सुरू होतील.
यावेळी सौ. विमल गव्हाणे, विलास गव्हाणे. दरेपा बिराजदार, मल्लिकार्जुन करपे, धोंडिबा नडगम, सिद्धाराम पुराणिक, संतोष पुराणिक, गौरीशंकर हलगोदे आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments