हत्तूर येथे ३ डिसेंबरला अभिनव सिद्धारुढ स्वामीजींचे प्रवचन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे मंगळवार दि.३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता षण्मुखारुढ मठ विजयपूर व शांताश्रम हुबळी मठाचे श्री अभिनव सिद्धारुढ स्वामीजींचे प्रवचन होणार आहे तरी पंचक्रोशीतील सदभक्तांनी प्रवचनाचा व गुरुदर्शन आशीर्वादाचा लाभ घ्यावा.
गेल्या १५ वर्षांपासून परमपूज्य गुरुवर्य लिं. अभिनव शिवपुत्र महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षी अध्यात्मिक प्रवचनाचा सुविचार संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.बरुरचे आनंद शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत याही वर्षी प्रवचन हत्तूर गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात संपन्न होणार आहे तरी सदभक्तांनी अध्यात्मिक प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धारुढ सदभक्त मंडळ व हत्तूर ग्रामस्थ यांनी केले आहे.
0 Comments