२६/११ निमित्त कोन्हेरी येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांच्या स्मरणार्थ आर. जे सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या सामाजिक उपक्रमात मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे १७७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यासह आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये आरोग्य शिबिरामध्ये १६० नागरिकांनी भाग घेतला.
मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे प्रत्येक वर्षी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदाच्या स्मरणार्थ विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर यावर्षी रक्तदान शिबिर, आधार कार्ड कॅम्प व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत १७७ जणांनी सहभाग नोंदवला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यासह आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ईसीजीसह शुगर, बीपी, तसेच सर्व रक्तांच्या तपासणी करण्यात आल्या. यामध्ये १६० नागरिकांनी सहभाग नोंदवला तर आधार कार्ड काम मध्ये ५४ आधार कार्ड काढण्यात आले. यावेळी प्रशासनातील तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी भेटी देत या सामाजिक संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
प्रारंभी माजी सैनिक हरिदास माळी, ज्ञानोबा गायकवाड, मारूती माने, श्रीमंत शेळके, बाबुराव शेळके, संतराम जरग, शिवाजी गाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी रामदास जरग, राजकुमार पाटील, परमेश्वर माने, राजकुमार पांढरे, दत्तात्रय माने, राजाराम जरग, भिमराव कौलगे, सत्यवान शेळके, दशरथ रंदवे, अंगत शेळके, सलीम मुजावर, बालाजी कदम, दत्ता मुळे, बाळासाहेब शेटे, महादेव माने, दीपक जरग, अशोक शेळके, संदीप जरग, महेंद्र जरग, अविनाश सुतार, दीपक कुंभार, प्रतापसिंह जरग, नहेश शिंदे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments