Hot Posts

6/recent/ticker-posts

मसिहा सामजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर

 मसिहा सामजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मसिहा सामजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील संस्थेने  २६/११ दहशतवादी हल्ल्यात  देशाच्या संरक्षणार्थ  शहिद झालेल्या  देशाच्या सुपुत्रांच्या स्मरणार्थ व संविधान दिवस निमित्त रक्तदान शिबिर दि. 26/11/2024 रोजी  , मसिहा चौक, सकाळी 8.00 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत मसिहा चौक  मोदी, सोलापूर येथे तसेंच सोलापुर ब्लड बँक हयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते.  
सदर शिबीरा अंतर्गत गरीब व गरजवंताना वर्षभरामध्ये संस्थेच्या वतीने विनामूल्य रक्ताचे पँकेट्स पुरवले जातात.
शिबीराची सुरूवात (आनंद थिटे (Api) व नगरसेविक कामिनी आडम, रणजीत भंडारे)  हस्ते शहिदांच्या  प्रतिमेस पुष्पहार घालुन करण्यांत आले.
संस्थेचे संस्थापक अमित मंचले ह्यांनी सदर शिबीरात ह्या वर्षीदेखील रक्त संकलनाचा नवा उच्चांक 275 आपण गाठु शकलो अशी माहिती दिली व सदर शिबीर यशस्वीरित्या पारपडण्यास  कारणीभुत  सुरेश फरड, सुनील काडे, अजय भंडारी, प्रमोद कुरकल्ली, रवी भंडारे टायसन जगले, संपत जंगम, महेश कंपली, संजय साळवे,, टोनी जगले,सिमोन परमपोगुल, जॉन्सन रामजीते, नाथन बुरले, सिमोन पोगुल, गौतम जगले, राजु बळगेरी तसेंच सोलापुर ब्लड बँक मसिहा तरूण मंडळ, सहकारी मित्रवर्ग,व सर्व रक्तदात्यांचे मन:पुर्वक आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments