शहर उत्तर चा काहीच विकास नाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 18, 2024

शहर उत्तर चा काहीच विकास नाही

 शहर उत्तर चा काहीच विकास नाही




सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली महेश कोठे यांच्यासाठी सभा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या वीस वर्षांपासून सर्व काही आहे तसेच आहे, काही सुधारणा नाही, म्हणत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची विजयकुमार देशमुख यांच्यावर नाव न घेता टीका केली, तर महेश कोठे याना निवडून देण्याशिवाय पर्याय नाही

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर उत्तर मतदार संघाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जाहीर सभा शेळगी येथे पार पडली, व्यासपीठावर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती,

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणातून विजयकुमार देशमुख यांचे नाव न टीकास्त्र केले, गेल्या वीस वर्षांपासून सर्व काही आहे तसेच आहे कोणतीही सुधारणा झाली नाही, जो माणूस सकाळी जाऊन सही करतो, दुपारी कँटीन मध्ये जातो आणि संध्याकाळी घरी जातो अशा माणसाला पाच वर्षे निवडून देणार का कधी डोळे उघडून हद्दवाढ बघितलं नाही, सोयी सुविधा बघितल्या नाहीत, लोकांच्या पाण्याचा प्रश्न बघितला नाही, अशी टीका आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता केली त्यामुळे आता महेश कोठे याना निवडून द्या असे आणि विकासाची तुतारी वाजवा असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले

यावेळी चाकोते, सुरेश पाटील, मनोहर सपाटे, नागेश वल्याळ, उदयशंकर चाकोते, भारती इप्पलपल्ली यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्यने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages