अनगरच्या पाटील विद्यालयात मतदार जागृती अभियान रॅलीचे आयोजन
अनगर (कटूसत्य वृत्त):- कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, अनगर, राष्ट्रीय सेवा योजना(+2) व महाराष्ट्र छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. विद्यालयाच्या मैदानावरून प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅली मार्गस्थ केली. शिवाजी चौकामध्ये ग्रामस्थांनी रॅलीचे स्वागत केले. आधी मी जाईन मतदानाला, नंतरच जाईल माझ्या कामाला. सोडा सारे काम धाम, मतदान करणे पहिले काम. निर्भय होऊन मतदान करा, देशाचा सन्मान करा. चला मतदान करूया, देशाची क्रांती घडवूया. लोकशाहीचा आहे आधार, मत घालू नका बेकार. अशा घोषणा देऊन स्वयंसेवकांनी परिसर दणाणून सोडला. रॅली संपूर्ण अनगर गावामध्ये फिरून विद्यालयाच्या प्रांगणात समारोप करण्यात आला. रॅली यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक महादेव चोपडे, कार्यक्रमाधिकारी पांडुरंग शिंदे , हरी शिंदे, संजय नीलकंठ, विनायक कोल्हाळ यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे संस्थापक माजी आमदार राजनजी पाटील , अध्यक्ष बाळराजे पाटील साहेब व सिनेट सदस्य तथा सचिव अजिंक्यराणा पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
रॅली यशस्वी करण्यासाठी रमेश चव्हाण, सत्यवान दाढे, दाजी गुंड, सोमनाथ ढोले, सत्यवान कांबळे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments