शब्द झोपले तर समाज झोपतो- नूरजहाँ शेख
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शब्द झोपले तर समाज झोपतो,शब्द पेटले तर इतिहास बदलतो असे मत नूरजहा शेख यांनी व्यक्त केले.
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा मार्फत, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात, आयोजित करण्यात आलेल्या चौथे युगस्त्री फातिमा शेख साहित्य संमेलनातील, कवी संमेलनाध्यक्ष नूरजहाँ शेख बोलत होत्या.
पुढे बोलताना शेख म्हणाल्या, कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती अन्यायाविरुद्धची लढाई आहे, असे ठणकावून सांगताना अध्यक्षांनी कवी-लेखकांना निर्भीडपणे सत्य मांडण्याचे आवाहन केले. त्यांच्या आक्रमकपण संवेदनशील शैलीने उपस्थित रसिक भारावून गेले.
स्त्रीला दुय्यम ठरवणाऱ्या मानसिकतेवर त्यांनी निर्भिडपणे प्रहार करत लेखणीचे शस्त्र हे अन्यायाविरुद्धचे प्रभावी हत्यार असल्याचे ठणकावून सांगितले.
या संमेलनाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सहत्यिक डॉ.श्रीपाल सबनीस व सौ ललिता सबनीस तसेच संस्थापक शफी बोल्डेकर ,कार्याध्यक्ष खजभाई बागवान ,सह सचिव अनीसा शेख ,जिल्हाध्यक्ष दीलशाद शेख ,सम्मेलनअध्यक्ष मेहमूद शेख ,समाजसेवक डॉ.सलीम शेख आदी साहित्यिक मान्यवर व राज्यभरातून आले कवी उपस्थित होते.
.png)
0 Comments