चित्रकला परीक्षेत तडवळे कन्या शाळेचा 100 टक्के निकाल
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा कसबे तडवळे येथिल इयत्ता सातवी एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षा नोव्हेंबर 2025
मध्ये झाली होती. त्यामध्ये तेरा विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये शाळेतील 13 पैकी 13 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून 100% टक्के निकाल चित्रकला ग्रेड परीक्षा चा लागला आहे.त्यामध्येA ग्रेड मध्ये 10 विद्यार्थ्यांनी व B ग्रेड मध्ये 3 विद्यार्थिनी असा अतिशय उत्कृष्ट निकाल लागला आहे.त्यामध्ये नंदिनी दीपक मते जेबा महेश सत्तार शेख. प्रांजली पोपट चव्हाण. सानिका सुरेश गुटे. सफिया मोमीन गौसिया. चंचल अमोल निकाळजे. आयेशा इक्बाल तांबोळी. वेदिका विनोद चव्हाण. आलिया तोफिक कोतवाल. आराध्या नितीन अडसूळ. स्नेहा परसराम कोरडे. सालिहा मुबारक तांबोळी. वैष्णवी बालाजी जमाले.
असा शंभर टक्के निकाल लागल्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थिनीचे,मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती ज्योती पंडित मॅडम(कलाशिक्षिका) व त्यांना सहकार्य करणाऱ्या प्रियंका आडसूळ/डुकरे यांचेही शाळा व्यवस्थापन समिती कसबे तडवळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक रहिमान सय्यद,जेष्ठ शिक्षक जगन्नाथ धायगुडे.पांडुरंग तनमोर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका, पालकांकडून अभिनंदन होत आहे.

0 Comments