Hot Posts

6/recent/ticker-posts

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव बसण्णा कोगनुरे यांचा झंजावात दौरा.

 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

 अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव बसण्णा कोगनुरे यांचा झंजावात दौरा.

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा दक्षिण सोलापूर मध्ये झंजावात दौरा पहायला मिळाला. आज नांदणी,औज मंद्रूप, बरुर,कारकल,हत्तरसंग,लंवगी,चींचपुर, सादेपुर, टाकळी,बाळगी,कुरघोट,आनंद नगर आदी गावातून महादेव कोगनुरे यांचा दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.या गावभेट दौऱ्यात युवक,महिला,वयोवृद्ध नागरिक,शेतकरी ,शेतमजूर ,व्यापारी ,नोकरदार वर्ग महादेव कोगनुरे यांना प्रतिसाद देताना दिसून आले.सर्व सामान्य माणूस महादेव कोगनुरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी धडपड करताना मतदारसंघात पहायला मिळाले.सर्व सामान्य माणसांच्या सुख दु:खात सहभागी होणारा महादेव यांना सर्व सामान्य माणसांच्या ह्रदयात स्थान मिळाल्याने ते नक्कीच निवडून येणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात होते.प्रत्येक गावोगावी महादेवाचा जल्लोषात स्वागत करीत फटाक्यांचे आतषबाजी करीत सामान्य नागरिक महादेवाशी चर्चा करताना दिसून आले. प्रचंड प्रतिसाद पाहून महादेव कोगनुरे ही भारावून गेले होते.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व एम के फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments