महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाचा देवेंद्र कोठे यांना जाहीर पाठिंबा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोळी समाजाची स्वीकार संस्था असलेल्या कोळी महासंघाच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. जाहीर पाठिंब्याचे हे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांचे चिरंजीव चेतन दादा पाटील आणि अरुण भाऊ लोणारी यांच्या हस्ते देवेंद्र दादा कोठे यांना देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक राजकुमार हंचाटे, विश्वनाथ प्याटी, मनोज कलशेट्टी, प्रभाकर गंपले, आप्पू कडगंची, प्रमोद सलगर, बसवराज कोळी, सिद्धाराम खजुरगी, विजय महिंद्रकर, भीमाशंकर जावळे, भीमाशंकर बिराजदार, दशरथ पाथरुट व गजानन शेजाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments