एका दिवसात तीन ठिकाणचे अतिक्रमण काढले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थंड पडलेली महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा जोमात चालू झाली आहे. मंगळवारी (दि. २६) शहराच्या विविध भागांत मोहीम घेत दोन खोकी, चारचाकी गाड्यांसह लोखंडी साहित्य जप्त केले. मंगळवारी सकाळच्या सत्रात महापालिकेच्या दाराशा हॉस्पिटलच्या कंपाऊंडलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. दाल चावल विक्रेत्यांनी कट्टा बांधून आपला बेकायदा व्यापार चालू ठेवला होता. ते अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले, तर सिमेंटचा कट्टा जमीनदोस्त केला. लोखंडी टेबल, गॅस टाकी इतर साहित्य जप्त केले.
दुपारच्या सत्रात महिला हॉस्पिटल येथील फळगाड्यांचे अतिक्रमण काढले. वैष्णवी प्लाझा, जुळे
सोलापूर येथील रस्त्यावरील बेकायदा खोक्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. या मोहिमेत दोन लोखंडी खोकी. चारचाकी हातगाड्या चार, लोखंडी वजनकाटे व स्पिकर हे साहित्य जप्त केले. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागप्रमुख हेमंत डोंगरे,तुफियान पठाण, मुतूज शहापुरे यांनी ही मोहीम पोलिस बंदोबस्तात यशस्वी केली.
0 Comments