Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपला पाठिंबा दिल्याच्या वृत्तामागे मला बदनाम करण्याचा कट-आ. डॉ. बाबासाहेब देशमुख

 भाजपला पाठिंबा दिल्याच्या वृत्तामागे मला बदनाम करण्याचा कट-आ. डॉ. बाबासाहेब देशमुख




सांगोला, दि. २६- शेतकरी कामगार पक्षाने कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने भाजपला पाठिंबा देण्याबाबतची चर्चा खोटी आहे. भाजपला पाठिंबा दिल्याची अफवा पसरवून मला बदनाम करण्याचा कट असल्याचे शेकापचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी म्हटले आहे. सध्या मुंबईमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडीला वेग आला आहे.त्यामध्ये सांगोल्याचे नूतन आ.डॉ. बाबासाहेबी देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे काही टीव्ही चॅनलने वृत्त दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मंगळवारी आपली भूमिका मांडली. आ.देशमुख पुढे म्हणाले की, मी शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आहे. जर कोणाला पाठिंबा द्यायचा असेल तर त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांना आहे. मी पक्षाचा पाईक आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मलाही बंधनकारक असणार आहे. महायुतीला व विशेषतः भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे ते आम्हाशी कसे बोलतील. जर बहुमतासाठी गरज असती तर ते आमच्या पक्षाशी बोलले असते. त्यांना पाशवी बहुमत मिळाले आहे. सध्या काही चॅनलवर प्रसिध्द होणारे वृत्त मला बदनाम करण्यासाठी कोणीतरी मुद्दाम पसरवत असल्याची शक्यता अधिक असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments