Hot Posts

6/recent/ticker-posts

महायुती सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये

 महायुती सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने केले आहे. महायुती सत्तेत आल्यास महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिले. बुधवारी, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ सुनील नगर परिसरात वाघ यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर,महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, ओवीसी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस इंदिरा कुडक्याल, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा रंजीता चाकोते,प्रदेश चिटणीस अर्चना वडनाल,प्रदेश कार्यकारिणी सदस्या शोभा नष्टे, माजी नगरसेविका राधिका पोसा, विजयलक्ष्मी गड्डम, सोशल मीडिया मध्य विधानसभा महिला प्रमुख अंजली वलसा, शहर चिटणीस सावित्री पल्लाटी, संगीता खंदारे, मोनिका कोठे, जैन प्रकोष्ठ प्रमुख साधना संगवे, लक्ष्मी वदलापुरे, राधिका चिलका, धनश्री कोंड्याल, अर्चना वोमड्याल उपस्थित होते. वाघ म्हणाल्या, ज्या महिलांना अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत अशा सर्व महिलांना निवडणूक संपल्यानंतर मागील चारही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. महिला भगिनींना योजनेचे पैसे मिळू नयेत याकरिता काँग्रेस, उध्दव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे न्यायालयात गेले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही महिला विरोधी भूमिका मतदान करताना महिलांनी आणि पुरुषांनीही ध्यानात घ्यावी, असे आवाहनही वाघ यांनी यावेळी केले.उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले,सुनीलनगर आणि परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद पदयात्रा, प्रचार फेरी, होम टू होम पदयात्रा, प्रचार फेरी, होम टू होम प्रचार अभियानाला मिळत आहे.त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले.
शिवानंद पाटील, विनायक कोंड्याल,मेघनाथ येमूल,डॉ.राजेश अनगिरे, काशीनाथ झाडबुके, सुनील गौडगाव, दत्तात्रय पोसा,गिरीश बत्तुल, भीमाशंकर बिराजदार, सिध्दाराम खजुरगी,मंडल उपाध्यक्ष भीमाशंकर जावळे, सुनीता कामाठी, अभिषेक चिंता,अंबादास सकिनाल,भास्कर बोगम, डॉ. राजेंद्रप्रसाद गाजूल आदी सहभागी झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments