काम करणाऱ्यांच्या पाठीशी - राजन पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 7, 2024

काम करणाऱ्यांच्या पाठीशी - राजन पाटील

 काम करणाऱ्यांच्या पाठीशी - राजन पाटील


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  आमदार काय करु शकतो हे यशवंत माने यांनी दाखवून दिले असून जिल्ह्यात सर्वात जास्त विकासनिधी त्यांनी आणला आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, ही संस्कृती असून ती जपत असताना आम्ही नैतिकतेचे राजकारण करतो, अशी भूमिका राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी स्पष्ट केली.मोहोळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. यशवंत माने यांच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ गावांच्या प्रचाराची सुरुवात मार्डी येथे श्री यमाई देवीला श्रीफळ वाढवून करण्यात आली. त्यानंतर झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. राज्य रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष व भाजपचे नेते शहाजी पवार, मार्डीचे

माजी सरपंच अविनाश मार्तंडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सुवर्णा झाडे,
जिल्हा कार्याध्यक्षा उज्ज्वला पाटील, शिवाजी सोनार, इंद्रजीत पवार, काशीनाथ कदम,
ज्योती मार्तंडे, जलवंता मठे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, सुनील भोसले,
राजाराम गरड, प्रकाश चोरेकर, संभाजी दडे, दयानंद शिंदे, अरुण मुडके, रेवणसिध्द कापसे,
तानाजी पवार, संग्राम पाटील यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, मॅचफिक्सिंगसारखे क्षणात उमेदवार बदलणाऱ्यांपैकी आम्ही नाही. आम्ही काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असतो.अविनाश मार्तंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा
निर्णय उशिरा घेतला. मोहोळकरांची ताकद त्यांच्या पूर्ण पाठीशी असेल, असे ते म्हणाले.
शहाजी पवार म्हणाले, प्रत्येकवेळी मोहोळमध्ये राजन पाटील यांनी वेगळा उमेदवार
दिला. यावेळी मात्र पुन्हा आमदार माने यांना उमेदवारी देऊन काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला
न्याय दिला असून उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ गावांमधील मताधिक्याची जबाबदारी
आमच्यावर सोडा. सहनशिलतेचा अंत संपला म्हणून तालुक्यातील सामान्य जनतेच्या
हितासाठी मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे अविनाश मार्तंडे म्हणाले. शहाजी
पवार, अविनाश मार्तंडे आणि मी आम्ही तिघे सारे मतभेद विसरुन जोमाने कामाला लागलो आहोत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तिघे प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असे झाडे म्हणाल्या.यावेळी मंजूर शेख यांनी मुस्लीम समाजाला महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.काशीनाथ कदम यांनी प्रास्ताविक तर प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages