पाच वर्षांत झालेली विकासकामे जनतेला सांगा
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- गेल्या पाच वर्षांत आपण गावासाठी जी विकासकामे केली ती जनतेला सांगून भाजप- महायुतीला भरघोस भरघोस मतदान करावे, असे आवाहन आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकत्यांना केले.अक्कलकोट मतदारसंघातील बासलेगावमध्ये विधानसभा आयोजित बैठकीत मार्गदर्शन निवडणुकीच्या प्रचारार्थ करताना आ.कल्याणशेट्टी कल्याणशेट्टी बोलत होते. म्हणाले, या गावासाठी महादेव नगर, अंबाबाई देवस्थान व भवानी मंदिर ते हनुमान मंदिर पर्यंत पेव्हर ब्लॉक बसवणे,धनगर वस्ती येथे सिमेंट रस्ता,ढोर वस्ती येथे अंतर्गत सिमेंट रस्ता, जि. प. शाळा ते धनगर वस्ती हनुमान मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता, भवानी मंदिर येथे बोरवेल विद्युत मोटर बसवणे, जि. प. प्राथमिक कन्नड माध्यम वर्गखोली दुरुस्ती, ब्रह्मदेव मंदिर ते बिरदेव मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता, मांग वस्ती गटार बांधकाम, नाला खोलीकरण व सरळीकरण, जि. प. शाळेला टी. व्ही. संच भेट, लघुपाटबंधारे क्र. १, २, ४, यल्लप्पा बिराजदार घर ते ग्रामपंचायत विहीर सिमेंट रस्ता, हनुमान मंदिर, सेवालाल मंदिरासमोर सभामंडप बांधकाम,जि. प. शाळा १ वर्गखोली बांधकाम, अप्पाशा कंठेहळ्ळी शेत ते दत्ता पाटील शेतापर्यंत पाणंद रस्ता व खडीकरण, शिवलिंगेश्वर, मंदिर ते जगदेवी पुजारी शेतापर्यंत रस्ता, जलजीवन पाणंद योजनेंतर्गत पाणीपुरवठा सोय,बासलेगाव ते गळोरगी ग्रा.म. रस्ता सुधारणा, बासलेगांव फाटा ते गळोरगी रस्ता सुधारणा पहिला टप्पा, बासलेगाव फाटा ते गळोरगी रस्ता सुधारणा दुसरा टप्पा अशी कामे केली आहेत.त्याचप्रमाणे नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम या कामाला मंजुरी मिळालेली आहे. यावेळी सिध्दाराम बिराजदार, मोतीराम राठोड, महबूब अविनाश मडीखांबे, सिध्दाराम मुल्ला,बाके, श्रीनिवास गवंडी, लखन राठोड, जगदीश बिराजदार,काशीनाथ बिराजदार, बिरू बंदीछोडे, मल्लिकार्जुन देखणे, प्रभू निंबाळे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
0 Comments