दक्षिण' च्या प्रगतीसाठी आ. देशमुखांना पुन्हा संधी द्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 7, 2024

दक्षिण' च्या प्रगतीसाठी आ. देशमुखांना पुन्हा संधी द्या

 दक्षिण' च्या प्रगतीसाठी आ. देशमुखांना पुन्हा संधी द्या


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कर्नाटक, हिमाचल प्रदेश येथील काँग्रेस सरकारने महिलांना फसवले. महाराष्ट्रात महायुतीची लाडकी बहीण योजना चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे विरोधक घाबरले आहेत. आता आगामी काळात योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे महिलांना दरमहा २१०० रुपये मिळतील. आ.सुभाष देशमुख यांचे मतदारसंघातील काम मी जवळून पाहिले आहे;मतदारसंघाच्या प्रगतीसाठी त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावे, आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.हत्तरसंग कुडल येथे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. सुभाष देशमुख यांच्या प्रचार शुभारंभ दानवे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कर्नाटकातील राज्यसभेचे खा.इराण्णा कडाडी, आ. देशमुख,भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, तालुकाध्यक्ष संगपा केरके, माजी जिल्हाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, राम जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. दानवे

म्हणाले की, काँग्रेसने देशावर जवळपास ६० वर्ष राज्य केले पण शेतकर्यांना कधी १२ रुपये पाठवले नाहीत. भाजपाने पी.एम. किसान योजना राबवली. आता या योजनेत वाढ केली जाणार करून ती पंधरा हजार रुपये केले जाणार आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे,ज्यांनी बजेटमध्ये शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. आ. सुभाष देशमुख म्हणाले की, मंद्रूप एमआयडीसी रद्द करण्यात त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. पण तरुणांच्या कल्याणासाठी मी एमआयडीसी उभी करणारच आहे. ३५ वर्षांपासून रखडलेल्या वडापूर बॅरेजला मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे आगामी काळात मतदार संघात सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कुडलच्या श्री संगमेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी १७३ कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, डॉ. हवीनाळे, मळसिद्ध मुगळे,जगन्नाथ गायकवाड,आप्पासाहेब श्रीनिवास करली,मोटे, गौरीशंकर मेंडगुदले, नामदेव पवार, आनंद बिराजदार, मळेवाडी काका,हनुमंतराव कुलकर्णी,निलिमा शितोळे, तालुका महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पाटील,वृषाली पवार यांचे सह मतदार संघातील महायुतीचे पदाधिकारी,सरपंच उपसरपंच उपस्थित होते. सूत्रसंचालन यतीन शहा यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages