माझ्या राजकीय जीवनातील अखेरची निवडणूक : आ. शहाजीबापू पाटील
सांगोला (कटूसत्य वृत्त):- माझ्या राजकीय जीवनातील ही शेवटची निवडणूक असून
मतदारांनी आपल्या अनमोल मताचे दान द्यावे. माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येक मतदाराने रात्रीचा दिवस करावा असे आवाहन आ. शहाजीबापू पाटील यांनी बलवडी
येथे केले. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत
उमेदवार आ. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ बलवडी
येथे श्री सिद्धनाथाचे दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी पोपट यादव, प्रा. संजय देशमुख, दिनेश बाबर, माऊली
राऊत, रविराज शिंदे, दगडू बाबर, रमेश शिंदे, सचिन धायगुडे,
लक्ष्मण भोसले, दिगंबर धायगुडे, अर्जुन धायगुडे, प्रसाद शिंदे, गणेश
कमले, संतोष खुळपे, बाळासाहेब शिंदे, उत्तम सरगर, राजू पाटील,
वसंत पाटील, मल्हारी चव्हाण, राजू खरात, के. आर वाघमारे, जीवन
कांबळे, अजय सरगर, मंगेश रायचूरे, रामा दबडे उपस्थित होते.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, साहेबराव शिंदे,
विजय शिंदे, अॅड. विक्रमसिंह पाटील, बाळासाहेब शिंदे, महादेव
शिंदे, दीपक ऐवळे, दादासाहेब लवटे, श्रीकांत देशमुख, अजिंक्य शिंदे
यांनी मनोगत व्यक्त केले.
0 Comments