Hot Posts

6/recent/ticker-posts

भवानी पेठ,शाहीर वस्तीमध्ये तुतारीचा आवाज

 भवानी पेठ,शाहीर वस्तीमध्ये तुतारीचा आवाज 



(कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची चुरस वाढली असून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे हे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात कोठे यांच्या पदयात्रांना मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोठे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.


बुधवारी सकाळी प्रभाग तीन मध्ये महेश कोठे यांची पदयात्रा निघाली. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक पादयात्रेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी कोठे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

वीस वर्षाच्या खुंटलेल्या विकासामुळे आम्ही महेश कोठे यांच्यासोबत असून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार बीआरएसचे नागेश वल्याळ यांनी व्यक्त केला. मागील चार टर्मपासून आ. विजयकुमार देशमुख यांनी कोणतेही काम केले नाही. साधी मिरची कांडप मशीन आणू शकले नाहीत, पालकमंत्री आणि मंत्री असतानाही कोणतेच ठोस काम झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

देशमुख यांनी बालेकिल्ल्याच्या नावावर या भागातील लोकांची वीस वर्षे फसवणूक केली. त्यामुळे आता लोकांनी ठरवले आहे. यंदा शहर उत्तरमध्ये बदल दिसणार आणि मोठया मताधिक्याने जनता मला निवडून देईल, असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी नगरसेवक सुरेश पाटील, मनोहर सपाटे, विजय साळुंखे, दशरथ गोप, उदय चाकोते, सुदिप चाकोते, मधुकर आठवले, केदार उंबरजे, सिध्दू बावकर, युवराज सरवदे, भिमाशंकर अंकाराम, सुरेश बिद्री, अक्षय वाकसे, बिपीन पाटील, सुरज पाटील, समीर पांडगळे, महेश बिराजदार, नरसिंगराव येमुल, वासुदेव इप्पलपल्ली, शशीकांत कैंची, संदिप महाले, शंभय्या वडलाकोंडा, नागेश दासरी, प्रविण बतुल, विठ्ठल कोटा, प्रभाकर गुडेली, नरेश काशेट्टी आदींसह नागरिक मोठया संख्येने पदयात्रेत सामील झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments