Hot Posts

6/recent/ticker-posts

राजकारणाचा व्यापार करून लक्ष्मीपुत्र आणला - राजन पाटील

 राजकारणाचा व्यापार करून लक्ष्मीपुत्र आणला - राजन पाटील



कुरुल (कटूसत्य वृत्त):-

समोरची माणसं समाजासाठी काम करणारी नव्हे तर समाजाचा वापर करून स्वतःसाठी जगणारी ही लोकं आहेत. थोतांड टीका करून समाजाची दिशाभूल करण्याचं काम या लोकांकडून होत आहे. अनगरकरांवर टीका केल्याशिवाय यांचं पोट भरत नाही. टीका ही विकासात्मक असावी, टीका करताना तालुक्याचे व्हिजन काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. ज्यांना स्वतःचं व्हिजन नाही अशा लोकांनी राजकारणाचा व्यापार करून जनतेला दावणीला
बांधण्यासाठी लक्ष्मीपुत्र आणला असल्याचा घणाघात माजी आमदार राजन पाटील यांनी केला.

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कुरुल (ता. मोहोळ) सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, तालुक्यामध्ये उपटसुंभ्या लोकांची टोळी तयार
झाली आहे. आ. यशवंत माने यांच्यासारखा विकास पुरुष आमदार म्हणून लाभला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली. आता त्यांना देखील या पाच वर्षात पुन्हा कायम करण्याची संधी आपल्याला आली आहे.


यावेळी उमेदवार आ. यशवंत माने म्हणाले की, माझ्यासारख्या नवख्या चेहऱ्याला राजन पाटील यांनी सधी दिली. कुरुल सारख्या गावात २ हजारांचा लीड तोडून ९७ मतांचे मताधिक्य दिलं. तालुक्यासह मतदार संघातील जनतेने मला स्वीकारलं. या पाच वर्षात माझ्याकडे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारकडून मतदारसंघाचा सर्वाधिक विकास करण्याचे भाग्य मला लाभले. येणाऱ्या काळात पुन्हा

कुरुल-पंढरपूर रस्त्याचा वनवास संपविला

मोहोळ तालुक्यासह मतदारसंघामध्ये या पाच वर्षात आ.माने यांनी साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी आणला. कुरुल-पंढरपूर हा रस्ता स्वातंत्र्यापासून झाला नव्हता. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने झाली. रक्ताने पत्र, खड्डयात रक्तदान आंदोलन असा आवाज उठवीला गेला. मात्र वर्षानुवर्ष खड्डेमय रस्त्याचा प्रवास सुखकर केला तो आ.यशवंत माने यांनीच. या रस्त्यासाठी पहिल्यांदा २० कोटी आणि नंतर २७२ कोटी निधी दिला आहे. त्यामुळे या रस्त्यानेजाणारा व्यक्ती आ.माने यांना निश्चितच मत देईल, असे भीमा परिवाराचे प्रवक्ते पांडुरंग ताटे यांनी म्हटले.

एकदा मला सेवेची संधी द्या. पुन्हा एकदा यापेक्षा जास्तीचा निधी खेचून आणण्याची जबाबदारी पार पाडेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्वाती लांडे, ज्योत्स्ना पाटील, युवा सेनेचे गणेश जाधव, राहुल कसबे, पांडुरंग ताटे, महेश पवार, दीपक भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जालिंदर लांडे, सरपंच शिला माने, उपसरपंच पांडुरंग जाधव, यतचे दीपक भोसले, भाजपाचे संजीव खिलारे, अस्लम चौधरी, बाळासाहेब पाटील, सुरेश जाधव, चंद्रहार चव्हाण, सीताराम लांडे, सुनील चव्हाण, समाधान पाटील, रमेश जाधव, छत्रपती जाधाव, बाळासाहेब लांडे, धनाजी चंदनशिवे, सुभाष माळी, संभाजी पाटील, बबलू जाधव, यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली जाधव यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments