आष्टी योजनेत देवडीचा समावेश का केला नाही?
आ. माने, देवडी, वाफळे व सिद्धेवाडीत प्रचार सभा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता लागेपर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत कोट्यवधीचा निधी आणलाआहे. देवडीसाठी दहा कोटी दिले. अनगर व दहा गावांच्या पाणीपुरवठा योजनेत संपूर्ण देवडी गावाचा समावेश ,केला. तुमचा एवढा विरोधकांना पुळका होता तर आष्टी उपसासिंचन योजनेत देवडीचा समावेश का केला नाही? या दहा गावांचे पालकत्व माजी आमदार राजन पाटील यांनी स्वीकारल्याचे
प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार यशवंत माने यांनी केले.
आमदार माने यांच्या प्रचारार्थ मौजे देवडे, वाफळे व सिध्देवाडी येथील प्रचारसभेला माजी आमदार राजन
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देवडी येथील सभेत आमदार माने यांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. देवडी, वाफळे, सिद्धेवाडी, कुरणवाडी, आष्टी या गावांचा प्रचार दौरा केला. आमदार माने म्हणाले की, अनगर व दहा गावे उपसा सिंचन योजनेचा तीन वर्षे
पाठपुरावा केला. खास बाब म्हणून ही योजना केली. देवडीसह वाफळे गावाचाही या योजनेत समावेश केला
आहे. पाणीपुरवठ्यासह या गावांतील पाझर तलावही भरून घेण्याची सोय असणारी ही एकमेव योजना आहे. या योजनेमुळे १८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. माजी आमदार राजन पाटील म्हणाले की, सत्तेपेक्षा पिढ्यान् पिढ्या आमच्या पाठीशी असणाऱ्यांचे आम्हाला ऋण फेडावयाचे आहे. निवडणूक आमदार माने यांची, विरोधक मात्र टिका आमच्यावर करतात. संकुचित वृत्तीची ही मंडळी आहेत. यावेळी तानाजी थोरात, संतोष जाधव, संजीव खिलारे, महेश पवार, अण्णासाहेब पाटोळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी दिनकर थोरात, सरपंच वैभव कांबळे, चंद्रहार mचव्हाण, मारुती पाटील, मदन पाटील, नागनाथ तळेकर, दीपक थोरात, सज्जन पाटील, सज्जन थोरात, बाबासाहेब थोरात आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments