विजापूर रोड परिसरातील पदयात्रेत महिलांचा उत्साह मोठा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना निवडून देण्याचा संकल्प विजापूर रोड आणि परिसरातील मतदारांनी व्यक्त केला.
मंगळवारी (दि. १२) सकाळी काडादी यांच्या प्रचारासाठी निघालेल्या पदयात्रेत महिलांचा उत्साह मोठा होता. काडादी हे सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाचे असून सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहेत. विकासाची दृष्टी असलेल्या काडादी यांच्या विजयाचा निर्धार मतदारांनी बोलून दाखविला.
सकाळी साडे आठ वाजता जुना विजापूर नाका येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला. फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल-ताशाच्या निनादात ही भव्य-दिव्य पदयात्रा निघाली. काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले टी-शर्ट घातलेले टोपी, उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडादी
यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलकदेखील होते. या पदयात्रेत सिध्दाराम चाकोते, गुरुराज माळगे, राजशेखर पाटील, शिवानंद पाटील - कुडल, विद्यासागर मुलगे, बाळासाहेब पाटील, डॉ. भारत
जाधव, सदाशिव बनसोडे, प्रा. विलास मोरे, रामलिंग शिंदे, प्रा. लहू गायकवाड उपस्थित होते. जुना विजापूर नाका येथून सुरु झालेली पदयात्रा गरिबी हटाओ एक नंबर झोपडपट्टी, गौतम नगर मार्गे मार्गस्थ झाली.
चौकट १
सोलापूर : सोलापूर दक्षिणचे उमेदवार धर्मराज काडादी यांच्या विजापूर रोड परिसरातील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपण केवळ निमित्त : काडादी देश, राज्य आणि महापालिकेतही त्यांच्याच हाती कारभार होता. मात्र, सूड आणि कुरघोडीच्या राजकारणाशिवाय सत्ताधाऱ्यांनी काहीच केले नसल्याने कंटाळलेल्या जनतेला सक्षम पर्याय हवा आहे. पदयात्रेस मिळत असलेला प्रतिसाद त्याचाच पुरावा आहे. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. आपण केवळ निमित्त असल्याचे काडादी यांनी सांगितले.
0 Comments