Hot Posts

6/recent/ticker-posts

पिठलं-भाकर खात, शेतकऱ्यांसह सोलापूर काँग्रेसने साजरी केली काळी दिवाळी

 पिठलं-भाकर खात, शेतकऱ्यांसह सोलापूर 

काँग्रेसने साजरी केली काळी दिवाळी

सोलापूर,  (कटूसत्य वृत्त):-एका बाजूला सत्ताधाऱ्यांच्या बंगल्यांवर दिवाळीचा जल्लोष, फराळाची मांदियाळी आणि उत्सवाचा माहोल सुरू असताना, दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या घरात मात्र काळोख पसरलेला आहे. अतिवृष्टी, भाजप महायुती सरकारची निष्क्रियता आणि शेतीविरोधी धोरणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज देण्यासाठी, शेतकऱ्यांना आजपर्यंत मदत न केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जुना जिल्हाधिकारी कार्यालय (पूनम गेट) येथे हे आंदोलन पार पडले. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि अतिवृष्टीग्रस्त मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पिठलं-भाकर आणि ठेचा खाऊन प्रतीकात्मक काळी दिवाळी साजरी केली.

यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले, “शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, भाजप-महायुती सरकारने केवळ घोषणा करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, असे सांगण्यात आले होते, परंतु आजतागायत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. घोषणांच्या गजरात सरकारने संवेदनशीलतेचा विसरच पडला आहे.”

          “शेतकऱ्यांना मदत देता येत नाही म्हणून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात जातीय आणि धार्मिक दंगली भडकविण्याचा प्रयत्न केला जातोय. डोळ्यावर झापडे आणि सत्तेच्या धुंदीत असलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या वास्तव समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.”

            “मुख्यमंत्र्यांनी ३१ हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली, पण ती मदत कुठे गेली हे जनतेला अजूनही माहिती नाही. घोषणा मोफत असतात, पण मदतीसाठी इच्छाशक्ती लागते — ती या सरकारकडे नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. उलट ऊस शेतकऱ्यांना टनामागे १५ रुपये मागणारा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची ओळख झाली आहे.”

          “मंत्र्यांच्या बंगल्यांत नोटांच्या बॅगा सापडत आहेत, हजारो कोटींचे जमीनघोटाळे उघड होत आहेत. एकीकडे शेतकरी बिकट परिस्थितीत आहेत आणि दुसरीकडे महायुती सरकार भ्रष्टाचाराच्या मेजवानीत रमलेले आहे. लबाडाच अवतान जेवल्याशिवाय खरं ठरत नाही — तसेच हे सरकार फक्त आश्वासनांचीच दिवाळी साजरी करत आहे.”

          खासदार प्रणिती शिंदे यांना लक्ष्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवरही चेतनभाऊ नरोटे यांनी टीका केली. “शेतकरी संकटात असताना, त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या वेदना जाणणाऱ्या प्रणिती ताईंना ट्रोल करणं हे निंदनीय आहे. धरणातून अनियंत्रित पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली, हे त्यांनी वस्तुनिष्ठपणे मांडले. पण चूक मान्य करण्याऐवजी शासनाने ट्रोलरांच्या फौजा सोडल्या. सत्य बोलणाऱ्यांवर टीका करणं म्हणजे जनतेच्या वेदनांचा अपमान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी चेतन नरोटे म्हणाले, “अदानी-अंबानींसारख्या उद्योगपतींची लाखो कोटींची कर्जे माफ करणारे मोदी आणि फडणवीस सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी का करू शकत नाहीत? सरकारने तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश सत्ताधाऱ्यांना झेलावा लागेल.”

           “सत्ताधाऱ्यांसाठी दिवाळीचा उत्सव आणि शेतकऱ्यांसाठी काळा अंधार — हा विरोधाभास महाराष्ट्रातील शेतकरीविरोधी राजकारणाचं जिवंत चित्र आहे,” असे चेतनभाऊ नरोटे यांनी सांगत सरकारला संवेदनशील होऊन शेतकऱ्यांच्या बाजूने ठोस निर्णय घेण्याचं आवाहन केले.

यावेळी मा. नगरसेवक प्रवीण दादा निकाळजे, विनोद भोसले, प्रदेश सचिव श्रीशैल रणधिरे, कार्याध्यक्ष हनुमंत सायबोलु, दक्षिण तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, उत्तर तालुका अध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, तिरुपती परकीपंडला, अब्दुल खलीक मुल्ला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रवक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, रोजगार स्वयंरोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल,  अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, ग्राहक संरक्षण सेल अध्यक्ष वैभव पाटील, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, माजी नगरसेवक दत्तू अण्णा बंदपट्टे, प्रा. भोजराज पवार, एन के क्षीरसागर, हारुण शेख, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अँड केशव इंगळे, रामसिंग आंबेवाले, अशोक कलशेट्टी, जिल्हा उपाध्यक्ष अँड संजय गायकवाड राधाकृष्ण विखे पाटील, शकील शेख गिरीधर थोरात, लखन गायकवाड,  सैफन शेख, अनिल जाधव, संजय गायकवाड, कुणाल गायकवाड, इलियास शेख, सुनील सारंगी, सुभाष वाघमारे, नूरअहमद नालवार, परशुराम सतारेवाले, सुशीलकुमार म्हेत्रे, तौसिफ शेख, सिद्राम सलवदे, माजी महिला अध्यक्ष अँड करीमुन्नीसा बागवान, सुमन जाधव, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, शशिकांत शिंदे, भीमराव शिंदे, मोहसीन फुलारी, सलीम मणुरे,  मोहसीन फुलारी, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, चंदा काळे, रुकीयाबानु बिराजदार, सुनिता बेरा, निशा मरोड, रोहिणी गायकवाड, सचिन पवार, महेंद्र शिंदे, व्यंकटेश बोमेन, श्रीशैल रणखांबे, अस्लम शेख, रावसाहेब व्हनमाने, महमद शेख, जीवनकुमार वाघमारे, गेनसिद्ध मोटे, रविकिरण मेहता, युवराज कापसे, आनंद मोरे, किसन साखरे, नरेश कोकुल, दाजी गोफने, अर्जुन कादे, शंकर मोरे, दौलत शिंदे, किसन साखरे, योगीराज साखरे, दादाराव पाटील, जयवंत कोळी, बाबुराव खलीपे, विकास कोकडे, पवन सग्गम, नागनाथ शावणे, सचिन सुरवसे, अभिलाष अच्युगटला, धैर्यशील बाबरे, मुमताज शेख,  विजयलक्ष्मी झाकणे, गौरी हादीमनी, अनिता भालेराव, मीना गायकवाड, यांच्यासह शेतकरी बांधव, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments