70 ते 80 वर्ष पूर्वीच्या वडाचे झाडाचे होणार पुनरोपण.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुळे सोलापूरला जोडणारा आसरा पुलाचे रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडे तोडण्यात आली आहे त्या ठिकाणी सुमारे 70 ते 80 वर्षांपूर्वीचे जुने वडाचे झाड सुद्धा तोडण्यात येणार होते पण संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांनी या वडाच्या झाडाचे पुनरोपण करण्यात यावे यासाठी संबंधित ठेकेदाराकडे ही मागणी लावून धरल्यामुळे या झाडाचे पुनरोपण आसरा येथील स्वामी समर्थ मंदिरासमोरील प्रांगणात करण्यात येणार असल्याची माहिती पी पी अँड ए कंट्रक्शन चे रोहण पाटील व वैभव जवळकोठे यांनी दिली आहे.
आसरा पूल रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध आंदोलन करण्यात आली होती याची दखल घेऊन आमदार सुभाष बापू देशमुख व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या आसरा पुलाच्या रुंदीकरणासाठी मोठा प्रमाणात निधी दिला होता. या झाडाचे पुनरूपण करण्यासाठी सर्वप्रथम वडाच्या झाडाच्या फांद्या कट करण्यात आलेल्या आहेत वडाच्या झाडाभोवती दहा फूट खोल खड्डा खांदून त्याची मुळे सुटसुटीत करण्यात येणार असून त्यानंतर आसरा येथील स्वामी समर्थ मंदिराच्या समोर सुमारे वीस फूट खोल खड्डा खाणून विविध खते टाकून व माती टाकून त्याचे पुनरोपण करण्यात येणार आहे.
आसरा पुलाच्या रुंदीकरणाच्या विकासकामांसाठी आसराकडून जाणारे उजव्या साईडचे सुमारे दहा ते पंधरा मोठी झाडे तोडण्यात येऊन या ठिकाणी परत 100 नवीन झाडे लावण्यात येणार आहेत
0 Comments