सुवर्ण मिठाई अर्थात "स्वर्णिम मिठाई" आणि तेही तिवाडी
यांच्या अन्नपूर्णाची - नंदकिशोर तिवाडी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर - यंदाच्या वर्षी प्रथमच तिवडी यांच्या अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरीने सोलापूरकर एक विशेष पद्धतीने दिवाळी साजरी करावी म्हणून सुवर्ण मिठाई अर्थात स्वर्णिम मिठाईने सोलापूरकरांनी दिवाळीची सुरुवात करावी असे मत अन्नपूर्णाचे प्रमुख व्यवस्थापक नंदकिशोर तिवाडी यांनी व्यक्त केली.दिवाळी म्हणजे मिठाई असं संपूर्ण देशाचा समीकरण आहे परंतु यात सुवर्ण मिठाई हे जयपूर येथील त्योहार मिठाईने उच्चांक गाठला आहे तेथील चव आणि दर्जेदार मिठाई सोलापुरकरांना मिळावी म्हणून तिवाडी यांच्या अन्नपूर्णा मिठाई नमकीन बेकरीने स्वर्णी मिठाई सोलापूरच्या बाजारपेठेत आणली आहे.
स्वर्णिम मिठाई यात खास करून 18 हजार रुपये प्रति किलो मिठाई देणार असून गिफ्ट पॅक मध्ये मोठा आठ हजार रुपये आणि छोटा 2800 रुपये असे ऑप्शन अन्नपूर्णा मिठाई ने ग्राहका करिता उपलब्ध करून दिले आहे. तसेच स्वर्णीम मिठाई सामान्य ग्राहकांना देखील घेता यावे म्हणून 400 रुपयाला एक नग देखील देण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे.
स्वर्णीम मिठाई गिफ्ट हॅम्पर दागिन्यांच्या ज्वेलरी बॉक्स प्रमाणे आकर्षक पॅक केलेले असल्यामुळे त्याची खासियत आणखीनच दिमाखदार होताना दिसत आहे. हि स्वर्णिम मिठाई गिफ्ट हॅम्पर तुम्ही अगदी जवळच्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी किंवा उच्च दर्जाचे मान्यवर किंवा तुम्हाला ज्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे अशा सोन्या सारख्या व्यक्तींना देण्याकरिता स्वर्णिम मिठाई गिफ्ट हॅम्पर आमच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असल्याचे तिवाडी यांनी सांगितले.
प्रत्यक्षात 85 हजार रुपये किलोचे सुवर्ण भस्म अफगाणिस्तानातील उच्च दर्जाचे कामरा बदाम, 4400 किलोचे मिस्टोरी पिस्ता साधारण 380 रुपयाचा वाडा यांच्यासह अतिउच्च दर्जाचे ड्रायफूट घटकापासून मिठाई बनवताना काश्मिरी के महीन केशर ने एक वेगळाच स्वाद या मिठाईच्या खाण्याने येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्षात भारतातील सर्वात महाग मिठाई चा दर 1 लाख 14 हजार रुपयापर्यंत असून जयपूर येथील त्योहार मिठाईने याचा उच्चांक गाठले असल्याचे त्यांनी सांगितले. ही जयपूर येथील मिठाई सुप्रसिद्ध असून आता सोलापूरकरांना महाराष्ट्रात उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि या स्वर्णिम मिठाईचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्नपूर्णा मिठाई नमकीन बेकरीचे प्रमुख तिवाडी परिवाराकडून करण्यात आलेले आहे.
स्वर्णिम गिफ्ट हॅम्पर मोठा आठ हजार रुपये, छोटा 2800 रुपये आणि 400 रुपये ला एक नग असे ऑप्शन अन्नपूर्णा च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध
0 Comments