सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या - आ. सुभाष देशमुख
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी शेतकरी वीज बिल माफ, लाडकी बहीण योजनेचा सोलापूर दक्षिण मतदारसंघातील हजारो लोकांना फायदा झाला आहे. महायुती सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे.
त्यामुळे महायुतीला मतदान करून तालुक्यासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला साथ द्यावी, असे आवाहन भाजपचे उमेदवार आ. सुभाष देशमुख यांनी केले.
आ. देशमुख यांनी रविवारी टाकळी, बरूर, बोळकवठे, संजवाड, होनमुर्गी आदी गावांना प्रचारार्थ भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी आ. देशमुख यांचे स्वागत केले. महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे आम्हाला उद्योग, व्यवसायाला हातभार लागत असल्याचे सांगितले.
आ. देशमुख म्हणाले की, मागिल 25 वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास या 10 वर्षाच्या कार्यकाळात झाला आहे. होटगी पर्यटन केंद्रासाठी 5 कोटींचा निधी, होटगी आश्रमशाळा आणि वसती गृह बांधण्यासाठी 32 कोटी, हत्तरसंग कुडल देवस्थानसाठी 13 कोटी, नांदणी वन व उद्योग केंद्रासाठी 3 कोटी, हिरज रेशीम बाजारपेठेसाठी साडेसात कोटी, वडापूर बॅरेजसाठी 67 कोटी निधी मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण तालुक्याला भरभरून निधी दिला आहे. आगामी काळातही यापेक्षा जास्त निधी तालुक्यात आणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मला निवडणून द्या.
0 Comments