विहिरीत पडलेल्या लांडग्याला मिळाले जीवदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

विहिरीत पडलेल्या लांडग्याला मिळाले जीवदान

 विहिरीत पडलेल्या लांडग्याला मिळाले जीवदान 



मोडनिंब  (कटूसत्य वृत्त):- सांगोला येथील साळुंखे वस्ती या ठिकाणी  विहिरीत पडलेल्या लांडग्याला पक्षी व सर्पमित्र संदेश पलसे यांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले.


शेतातील विहिरीत लांडगा पडला असल्याचे शेतीमालक मारुती शंकर साळुंखे यांना निदर्शनास आले. ही घटना पाहताच त्यांनी सांगोला येथील सर्प व पक्ष मित्र पलसे यांना फोन द्वारे माहिती दिली. 

 वन कर्मचारी वनिता इंगोले व गोवर्धन वरकुटे यांना फोन द्वारे ही माहिती पलसे यांनी दिली. वन कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लांडग्याला विहिरीतून व्यवस्थित बाहेर काढण्यात आले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर जाळी उघडताच लांडग्याने निसर्गात धूम ठोकली.

सोनू खडतरे लखन चव्हाण योगेश साळुंखे यांनी विहिरीत पडलेल्या लांडग्याला जीवदान देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली या विशेष कामी नागरिकांनी संदेश पलसे यांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages