शुक्रवारपासून सकाळी 6.25 वाजता विवेक घळसासी यांचे अ‍ॅम्फी थिएटरमध्ये निरूपण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

शुक्रवारपासून सकाळी 6.25 वाजता विवेक घळसासी यांचे अ‍ॅम्फी थिएटरमध्ये निरूपण

 शुक्रवारपासून सकाळी 6.25 वाजता विवेक घळसासी यांचे अ‍ॅम्फी थिएटरमध्ये निरूपण



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 25, शनिवार दि. 26, आणि रविवार दि.27 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वा. 25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर येथे विवेकाची अमृतवाणीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये  पूर्णयोग, पूर्णयोग ः अंतरंग साधना आणि पूर्णयोगातील गतिरोध या तीन विषयावर  ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी हे आपल्या अमृतवाणीतून वैचारीक दीपोस्तव साजरा करीत असल्याची माहिती मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे रांनी दिली.

गेल्या 14 वर्षापासून अखंडपणे विविध विषयावर दीपावलीपूर्व बौध्दिक मेजवानी देण्याची परंपरा विवेकाच्या अमृतवाणी मधून निरूपणकार विवेकजी घळसासी करीत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने हा वैचारिक दिपोत्सव साजरा करण्यात येत असून यासाठी पु ना गाडगीळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. विवेकाच्या अमृतवाणी मधून यंदाच्या वर्षी पहिल्या दिवशी पूर्णयोग, दुसर्‍या दिवशी पूर्ण योग - अंतरंग साधना, आणि तिसर्‍या दिवशी पूर्णयोगातील गतिरोध अशा तीन दिवसीय निरूपणातून वैचारीक दीपावली साजरी होणार आहे. दिवाळी पूर्वीची पहाट चांगल्रा विचाराने सुरू व्हावी दिवाळीची सुरूवात मंगलमय वातावरणात बौध्दिक मेजवानीने विवेकाच्या अमृतवाणीमधून केली जात आहे. यापुर्वी प्रभु श्रीराम, महाबली हनुमान, श्रीकृष्ण, चाणक्य, रामायण, महाभारत यावर प्रवचन करण्यात आले असून या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद देत सभागृहात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विवेक घळसासी यांच्या रसाळवाणीतून आलेल्रा प्रत्येक विषयाचे व्याख्यान ऐकून रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात. दिवाळीतील गोड फराळाचा आनंद घेण्यापूर्वी बौध्दिक विचारांची मेजवानी विवेकाची अमृतवाणी यातून मिळते.  
 सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी विवेक घळसासी यांचे निरूपण वेळेवर सुरू होऊन वेळेवर सकाळी 7.30 वाजता संपणार आहे. तरी या मंगलमय बौध्दिक आणि वैचारीक मेजवानी असलेल्या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्याकडून करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages