प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीही नाही- केंद्रप्रमुख दिगंबर काळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 5, 2024

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीही नाही- केंद्रप्रमुख दिगंबर काळे

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीही नाही- केंद्रप्रमुख दिगंबर काळे

माढा (कटूसत्य वृत्त):- कितीही अडचणी आल्या समस्या निर्माण झाल्या तरी हतबल न होता समस्या निराकरणावरती लक्ष केंद्रित करावं यामुळे समस्या तर सुटेलच पण एक वेगळा आनंद ही प्राप्त होईल परिणाम कारक गुणवत्तेच्या समस्येवरती व शाळेची प्रतवारी वाढवण्यासाठी निपुण भारत अध्ययन निष्पत्ती  हा भाग खूपच महत्वाचा आहे पॅट चाचणी घेतली आहे आता अध्ययन निष्पत्ती नुसार प्रत्येक मुलांचा अध्ययन स्तर निश्चित करून गुणवत्तेत मागे असणाऱ्या मुलांसाठी कृती आराखडा तयार करून प्रगत करावे मुलांसाठी वेळ द्या मुलाना स्वतःची मत मांडण्यास संधी द्या परिणामकारक संवाद साधला जावा प्रत्येक मुलं शिकू शकत ही भावना स्वतःमध्ये निर्माण करा विलक्षण इच्छाशक्ती समोर नियती गुडघे टेकते प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीही नाही असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी उपळाई व माढा केंद्राच्या शिक्षण शिक्षण परिषदेत शिक्षकांना संबोधित करताना बोलत होते

श्रीकांत काशीद यांनी स्वास्थ्य पत्रिका शाम चव्हाण यांनी निपुण भारत प्रशांत ओहळ गणित  पॅट चाचणी शिवाजी कदम  यांनी अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले चर्चेत सकिना आतर शुभांगी गवळी अनिल काळे यांनी सहभाग घेतला शिक्षण परिषदेची सुरवात माय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने  झाली सवेंद्र लंकेश्वर यांनी परिपाठ घेतला प्रास्तविक केंद्रप्रमुख सुरेश माळी यांनी केले आभार विजय काळे यांनी मानले विषयाला अनुसरून सुत्रसंचालन वैजीनाथ मोगल यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages