मार्कंडेय मंदिराच्या स्थापनेस 100 वर्षे पूर्णशताब्दी वर्षा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली, पदमशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय मंदिराच्या स्थापणेस 100 वर्षे पूर्ण होत असून मंदिराच्या शताब्दी महोत्सव निमित्त शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत मंदिरात श्री मार्कंडेय महामुनीचे पुर्नप्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केले असून दिनांक 11 ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनींचे प्रतिष्ठापना विधी आणि 12 ऑगस्ट रोजी श्री. मार्कंडेय महानुनीच्या मुळमुर्तीस "शतघटाभिषेक” कार्यक्रम व महाप्रसाद
कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. व तसेच यंदाच्या शतक महोत्सव निमित्त स्मरणीका काढण्यात येत असून त्याचे संपुर्ण काम श्री. प्रविण पोटाबत्ती हे पहात आहे. यंदाच्या वर्षी शतक महोत्सव निमित्त समाजासाठी ज्यानी योगदान दिली आहे असे सर्वश्री गंगाधर कुचन,
कै. इरप्पा बोल्ली, कै. विष्णुपंत कोठे, आडम मास्टर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे व तसेच समाजाचे तरुण उद्योजकांचा शतक महोत्सवात सत्कार करण्यात येणार आहे असं सुरेश फलमारी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस माजी महापौर जनार्दन कारमपुरी,रामचंद्र जन्नू,नरसप्पा इप्पाकायल,मुलीधर आरकाल,संतोष सोमा,महांकाळ येलदी,रमेश कैरमकोंडा,राकेश पुंजाल, शेखर कटकम, नागेश बंडी यांची उपस्थिती होती.
0 Comments