टेंभू उपसासिंचन योजनेचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक संपन्न
खा. मोहिते पाटील यांनी रखडलेले कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या
अकलूज (कटूसत्य वृत्त):- आज सिंचन भवन पुणे येथे टेंभू उपसासिंचन योजनांच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले व टेंभू उपसासिंचन योजनेचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळेस खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी टेंभू विस्तारीत उपसा सिंचन योजनेचा आढावा घेऊन माण खटाव, सांगोला तालुक्यातील लाभक्षेत्राला लवकरात लवकर लाभ मिळवा यासाठी रखडलेले कामे पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या..
तसेच कृष्णा नदीचे पुराचे पाणी तात्काळ उचलण्यात येऊन सांगोला तालुक्यातील माण नदीला पाणी सोडावे, त्याचबरोबर 0 ते 50 km पर्यंत सांगोला कालव्यात पाणी सोडण्याच्या सुचना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही इतर लोक दबावाचे राजकारण करतील त्या बळी पडून मनमानी पद्धतीने पाणी सोडू नये तसेच पाणी बंद करून नये. शेतकऱ्यांचा विचार करून पाणी वाटपाचे वर्षिक नियोजन करावे अशी देखील सुचना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली.
या बैठकीस जेष्ठ नेते प्रभाकर देशमुख ,सांगोला तालुक्याचे नेते डाॅ.बाबासाहेब देशमुख,अनिल देसाई,अभयसिंह जगताप,रणजितसिंह देशमुख,अर्जुनसिंह मोहिते-पाटील,झपकेसर,अनिकेत देशमुख ,सुरेंद्र गुदगे,कविताताई म्हेत्रे,मनोज पोळ,सुभाष नरळे, मुख्य अभियंता गुणाले,कार्यकारी अभियंता राजन रेडीय्यार, रासनकर,हरगुडे व लाभक्षेत्रातील प्रमुख नेतेमंडळी,नागरिक उपस्थित होते.
0 Comments