आनंददायी शिक्षण पद्धतीमध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर करावा- केंद्र प्रमुख दिगंबर काळे
माढा (कटूसत्य वृत्त):- लऊळ केंद्राची शिक्षण परिषद जि .प. शाळा पडसाळी येथे पार पडली त्यावेळेस त्यांनी विचार व्यक्त केले.
मुलांमध्ये अध्ययन निष्पत्ती येण्यासाठी परिणामकारक अध्यापन त्यासाठी शैक्षणिक साहित्य वापर ,आनंददायी शिक्षण व मुलाशी संवाद घडणे फार महत्त्वाचे आहे असे विचार मांडले. विद्यार्थी स्वास्थ्य पत्रिका निपुण भारत पॅट चाचणी यावरही मार्गदर्शन केले यावेळी प्र. केंद्रप्रमुख सोमनाथ ठाकरे , केंद्रीय मुख्याध्यापक कारंडे ,केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. यावेळी विविध विषयावर मार्गदर्शन लेंडवे श्रीमती आतकरे , कुंभार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सच्चिदानंद बरबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अष्टेकर यांनी केले
0 Comments