सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील कु.जुलेखा पठाण विद्यार्थीनीची जलसंपदा सहाय्यक अभियंता पदी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 5, 2024

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील कु.जुलेखा पठाण विद्यार्थीनीची जलसंपदा सहाय्यक अभियंता पदी निवड

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील कु.जुलेखा पठाण विद्यार्थीनीची जलसंपदा सहाय्यक अभियंता पदी निवड

अकलुज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने ३१ डिसेंबर २०२४ रोजी सहा. स्थापत्य अभियंता पदासाठी सरळ सेवा भरतीद्वारे  परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल ३१ जुलै २०२४ रोजी जाहीर झाला. त्यामध्ये  सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील शाखेची माजी विद्यार्थिनी  कु. जुलेखा पठाण हिने घवघवीत यश संपादन करत जलसंपदा पुणे विभाग परिमंडळ येथे सहाय्यक स्थापत्य अभियंता पद प्राप्त केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी दिली.

सदर विद्यार्थिनीच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव  राजेंद्र चौगुले यांनी तिचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.  तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages