चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागनाथ मुक बधीर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेह भोजन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीतआबा पाटील यांच्या ४१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कारखाना येथे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, शालेय मुलांना खाऊ, गणवेश व शालेय साहित्य वाटप असे विविध समाजपयोगी कार्यक्रम राबवुन साजरा करणेत येत आहे. त्यामध्ये आज दिनांक ०५.०८.२०२४ रोजी श्री नागनाथ मुक बधीर निवासी विद्यालय, बाभुळगांव येथील विदयार्थ्यांना स्नेह भोजन देण्यात आले. सदर कार्यक्रम कारखान्याचे संचालक अंगद चिखलकर, प्रविण कोळेकर, सिध्देश्वर बंडगर यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला. तसेच सदर मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यालयाचे प्रांगणामध्ये विविध फळांचे झाडांचे वृक्षारोपण करणेत आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक व स्वागत पर भाषणामध्ये बोलताना मुकबधीर शाळेचे शिक्षक राजेंद्र बाबर म्हणाले की, आपण मागील वर्षापासुन कारखान्याचे चेअरमन अभिजीतआबा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन येथील विदयार्थ्यांना स्नेहभोजन देण्याचा उपक्रम राबवित आहात. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. या निष्पाप बालकांकडुन आबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक अंगद उध्दव चिखलकर म्हणाले की, अभिजीत आबा पाटील त्यांच्या रुपाने आपल्याला धडाडीचे नेतृत्व लाभले आहे. वाढदिवसानिमित्त कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी या अनाथ मुलांसाठी स्नेह भोजन देवून हा स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे. आबांच्या हातुन असेच गोरगरीब जनतेसाठी समाजपयोगी कार्य घडावे व त्यांची वरचेवर प्रगती व्हावी अशा भावना व्यक्त करुन वाढदिवसानिमित्त अभिजीतआबा पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तेजस इंग्लिश मिडीयम बाभुळगांवचे संस्थापक महेश कथले म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन अभिजीतआबा पाटील यांच्या ४१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले बद्दल धन्यवाद दिले. अभिजीतआबा पाटील यांचे रुपाने आपल्या जिल्ह्याला तरुण व तडफदार असे नेतृत्व लाभलेले आहेत अशा भावना व्यक्त करुन शेवटी त्यांनी वाढदिवसानिमित्त अभिजीतआबा पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास शिवप्रेमी दुध संकलन या संस्थेचे चेअरमन गणेश गांडुळे, कारखान्याचे सेल्स ऑफिसर महेश घाडगे, कार्यालयीन अधिक्षक आबासाहेब कथले, संगणक विभाग प्रमुख सुधीर गुंड, असि. ऊस विकास अधिकारी बागल, सुरक्षा अधिकारी माळी, शेती विभागातील सर्व फिल्ड स्टाफ व इतर मान्यवर, मुकबधीर विदयालयाचे सर्व स्टाफ व कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments