शिवसेनेचे नगरसेवक अरविंद खरात यांनी केला स्वखर्चातुन रस्ता, नागरिकांनी मानले आभार
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा नगरपंचायतचे शिवसेनेचे नगरसेवक अरविंद खरात यांनी स्वखर्चातुन रस्ता करुन सामाजिक बांधिलकी दाखवुन दिली आहे.
माढा शहरातील बोधले वस्ती ला जोडणारा रस्ता मागील अनेक वर्षापासुन प्रलंबित होता.रस्ताच नसल्याने सध्या पावसामुळे शेतकरी,नागरीक,शाळकरी विद्यार्थ्याची मोठी गैरसोय होत होती.
ही गैरसोय ध्यानी घेऊन नुकतीच माढा नगरंपचायत मध्ये शिवसेनेचे नगरसेवक म्हणुन निवड झालेल्या अरविंद खरात यांनी प्रशासनाची वाट न पाहता एक लाखाच्या स्वखर्चातुन मुरुमीकरण करीत रस्ता तयार करुन दिला आहे.रस्ता करुन दिल्या बद्दल बोधले वस्ती भागातील नागरिकांनी अरविंद खरात यांचा सन्मान केला.नगरसेवक खरात यांनी आपल्या कामाची सुरुवात स्वखर्चातुन रस्ता तयार करुन केली आहे.यावेळी शंभु चवरे,पृथ्वीराज खेडकर,महेश खरात,स्वप्नील खरात,प्रसाद कुर्डे,बबलू माने,बाबा गोटे,नवनाथ गोटे,श्रीकांत गिरी,विपुल कदम,शुभम चव्हाण,दत्ता राऊत,नागेश बोधले यांचेसह नागरीक उपस्थित होते.

0 Comments