शिरूर करांच्या आरोग्यासाठी संसदेत किल्ले शिवनेरीचा छावा गरजला! खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी रांजणगाव वसाहती मधील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनीचे विरोधात उठावला संसदेत आवाज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 30, 2024

शिरूर करांच्या आरोग्यासाठी संसदेत किल्ले शिवनेरीचा छावा गरजला! खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी रांजणगाव वसाहती मधील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनीचे विरोधात उठावला संसदेत आवाज

शिरूर करांच्या आरोग्यासाठी संसदेत किल्ले शिवनेरीचा छावा गरजला! खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी रांजणगाव वसाहती मधील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनीचे विरोधात उठावला संसदेत आवाज

           शिरूर (कटुसत्य वृत्त): रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या अस्तित्वात असलेले महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनी मधून बाहेर नाली मध्ये दूषित पाणी व मैला सोडल्यामुळे या दूषित पाण्यामुळे तेथील शेतजमीन तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण या विरोधामध्ये आज संसदेमध्ये डॉक्टर कोल्हे यांनी कंपनीच्या कामकाजावरती गंभीर ताशेरे ओढत चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कंपनीच्या कामकाजा वरती बंदी आणण्याची मागणी केली.

           रांजणगाव औद्योगिक वसाहत ही केमिकल विरहित वसाहत असून येथे गेले अनेक वर्षांपासून शिरूर तालुका व परिसरातील राजकीय पुढारी तसेच राज्यातील प्रमुख मंत्री व सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून अनेक वेळा कंपनी समोर धरणे आंदोलन असेल तसेच उपोषण असेल असे प्रयत्न करून कंपनीने कुठल्याही पद्धतीचे दाद न देता परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला.

           मानवी शरीराला घातक असणारे पाण्यातील दूषित घटक या पाण्यामध्ये आढळून आलेले आहे या घटकांमुळे मुकी जनावरे पशुपक्षी शेती जमिनीतील मृदा या संपूर्ण भागातील संपुष्टात आलेले आहे

           प्रामुख्याने कंपनीचे दूषित पाणी ज्या भागातून जाते त्यामध्ये निमगाव भोगी अण्णापुर कर्डेलवाडी सरदवाडी या गावांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून या गावातील ग्रामपंचायने अनेक वेळा ठराव करून प्रदूषण महामंडळाकडे पाठपुरावा केला असून या प्रस्तावांना केराची टोपली दाखवण्याचे काम केलेले आहे 

           याचेच गंभीर दखल घेऊन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेत हा ज्वलंत प्रश्न आज उपस्थित केला असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात न्याय मिळण्याची अपेक्षा वाटत असून यावरती कायमस्वरूपी तोडगा निघावा असे नागरिकांमध्ये चर्चा आहे.

           रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील या कंपनीमुळे कंपनीचा प्रवाह ज्या ज्या भागामधून गेला आहे त्या त्या भागांमध्ये तेथील जलस्रोत पिण्याचे पाणी तेथील शेतीची मृदा अतिशय मोठ्या प्रमाणात खराब झालेले असून ज्या ज्या भागांमध्ये नुकसान झालेले आहे तेथील जलस्रोतांची तपासणी मृदेचे तपासणी तातडीने करावी अशी विनंती संसदेमध्ये करण्यात आले या कंपनीतील पाण्यामध्ये अनेक प्रकारचे मानवी आरोग्य धोका होणारे घटक मिश्रित असून तातडीने यावरती उपाय योजना करावी अशी विनंती संसदेत करण्यात आली कंपनी परिसरातील बहुतांश गावांमध्ये नागरिकांनी यावरती कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages