अकलूज येथील राणीताई बनपट्टे यांची समाज कार्यात उत्तुंग भरारी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- जिथे चुकीचे दिसत आहे, तिथे आम्ही गप्प बसणार नाही! चुकीच्या विरुद्ध आमचा लढा सुरू असेल, म्हणूनच मी, समाज सेवेचा विडा उचलून,जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे असे ठणकावून सांगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या राणीताई बनपट्टे यांचे, सध्या सर्वस्तरातून कौतुक होताना दिसत आहे नियतीने जन्मताच अखंड आयुष्यासाठी,अपंगत्व दिले.परंतु यामुळे निराश न होता, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर राणीताई बनपट्टे या, उत्कृष्ट समाजकारणाची धुरा सांभाळत आहेत.त्यांनी लोककल्याणकारी असे अनेक विधायक कार्य करून दाखवले व दाखवत आहेत.समाजकार्य करीत असताना,अत्यंत पारदर्शकपणे अंमलबजावणी करत, राणीताई बनपट्टे यांनी माळशिरस तालुक्यातील पंचक्रोशीत, आपल्या कार्याचा आणि नावाचा ठसा उमटवत, तमाम महिला भगिनीसाठी त्या आदर्श ठरल्या आहेत.
संयम, नम्रता, शिस्तप्रिय आणि समस्त समाजासाठी धाऊन जाणाऱ्या राणीताई बनपट्टे समाज कार्याशी एकनिष्ठ राहिल्या.सामाजिक पटलावरील रणरागिणी म्हणून राणीताई बनपट्टे यांना ओळखले जाते.आजपर्यंत त्यांच्या वाट्याला, महिला आझाद केंद्र तालुका माळशिरस अध्यक्ष, भारतीय विकास परिषद अध्यक्ष, नवमहाराष्ट्र विकास मंच जिल्हा आध्यक्ष, सिटीझन फोरम ऑन हुमन राईस सोलापूर जिल्हा अध्यक्ष, जय संतोषी माता बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जयविजय शंभुराजे बहुउद्देशीय स्वयंरोजगार सहकारी संस्था अकलूज, असे विविध प्रकारचे सामाजिक पदे आलेत, परंतु त्या पदांचा कधीच त्यांनी गर्व बाळगला नाही.आज त्या स्वस्त धान्य दुकानही चालवतात.तुम्ही स्वस्त धान्य दुकान चालवता यातून सामाज कार्यासाठी वेळ कसा काढता?असा प्रश्न राणी ताई बनपट्टे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की,स्वस्त धान्य दुकान हे चालविणे सुद्धा समाज सेवाच आहे. स्वस्त धान्य वाटप करताना अनेक महिला भगिनी त्यांच्या समस्या व्यक्त करतात असे त्या म्हणाल्या.तर त्यांच्या स्वस्त धान्य दुकानातील ग्राहक सचिन धनंजय गायकवाड यांनी सांगितले की,गेले दोन वर्ष बनपट्टे मॅडम स्वस्त धान्य दुकान चालवतात या दोन वर्षात मला वेळेवर धान्य मिळते.एखादे वेळेस धान्य घेऊन जाण्यास उशीर झाला तर,स्वतः मॅडम फोन करून आम्हाला धान्य घेऊन जाण्यास सांगतात असे त्यांनी सांगितले. यामुळेच,जणकल्याणासाठी,समासेवेसाठी, सदैव तत्पर असणाऱ्या राणी ताई बनपट्टे यांची समाजसेवेबद्दल
आत्मीयता दिसून येते.

No comments:
Post a Comment