बालोउद्यान विद्यालयात राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह निमित्त ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर राष्ट्रवादी OBC सेल अनिल छत्रबंद कार्याध्यक्ष बाबू पटेल यांनी कन्ना चौक येथील चौडेशवरी मंदिरातील बालोद्यान विद्यालयात शालेय विद्यार्थ्यासाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या उपस्थितीत OBC विभाग प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सलीम नदाफ यांच्या शुभहस्ते बुधवारी करण्यात आले.
सुरूवातीस व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी पार पडला .यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,OBC विभाग सेल प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सलीम नदाफ ,महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगधनकर,युवती अध्यक्ष किरण माशाळकर,माजी नगरसेवक नारायण माशाळकर यांच्या हस्ते चित्रकला आणि निबंधासाठी पेपर व पेन्सिल विद्यार्थ्यांना देण्यात आले त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खा सुनिल तटकरे यांचा चित्र काढण्याचा आणि निबंध लिहण्याचा विषय देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व जन विश्वास सप्ताह निमित्त OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष बाबू पटेल यांनी स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व अजित दादांचे कार्य हे आतापासूनच शालेय विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी असे उपक्रम आयोजित करण्यात यावेत असेही जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यावेळी बोलताना म्हणाले.
या वेळी OBC विभाग उपाध्यक्ष आयुब शेख , मिनाज बागवान ,संघटक संतोष वेळापूरकर,सचिव अर्जुन माळी,सोशल मीडिया शहर - जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे ,दशरथ शेंडगे-देशमुख ,प्रशालेचे मुख्याध्यापिका विद्या शिंपी, वाघोले , सावंत सर यांच्यासह प्रशालेतील इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
.jpg)
No comments:
Post a Comment