पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी आप्पाराव इटेकर यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 25, 2024

पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी आप्पाराव इटेकर यांची निवड

पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी आप्पाराव इटेकर यांची निवड

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत आप्पाराव इटेकर यांची बिनविरोध निवड झाली. सन २०२४—२५ ते २०२९—३०या पाच वर्षासाठी ही निवड झाली आहे. राज्य शिखर बॅंकेचे माजी संचालक अविनाश महागावकर यांनी  आप्पाराव इटेकर यांच्या नावाची शिफारस केली होती. पतसंस्थेच्या अध्यक्षस्थानी दिलीप पतंगे हे होते.आप्पाराव इटेकर हे साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेत  सचिव,चेअरमन पदे भुषवली आहेत.महाराष्टृ राज्य शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस  रमेश चौगुले,डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे  प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण,युवक शिक्षक संघटनेचे सोमेश्वर याबाजी व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेचे अ.गफुर अरब यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.सेवक पतसंस्थेच्या हितासाठी आपण या संचालकपदाचा उपयोग करण्याचे आश्वासन आप्पाराव इटेकर यांनी दिले.यावेळी गुरुनाथ वांगीकर, आप्पासाहेब पाटील, मुरलीधर कडलासकर,सचिन चौधरी,विरभद्र यादवाड,भिमराया कापसे,अनिल गायकवाड,संतोष  माशाळे,उल्हास बिराजदार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages