लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 24, 2024

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी

 लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी

 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप आदलिंगे हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.  यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी घाडगे गुरुदेव, धम्मेश गवळी, मंजुनाथ कुंभार, मैथिली कोळी आदींनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांचा जीवनप्रवास, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रदीप आदलिंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की
लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांनी ज्याप्रमाणे आपल्या जीवाची पर्वा न करता भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, त्याप्रमाणे आपणही त्यांचे योगदान स्मरणात ठेवून देशभक्तीची प्रेरणा घेऊन कार्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून यश संपादन करावे. शिक्षकांनी सुद्धा माझ्या हातून एक चांगला नागरिक कसा घडेल यासाठी तत्पर राहिले पाहिजे असे मनोगत प्राचार्य प्रदीप आदलिंगे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. सागर महाजन, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. सायली बडेकर, प्रा. वर्षा मानेदेशमुख, प्रा. मंजुश्री डोंगरे तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन विद्यार्थी प्रसाद नेटके व आभारप्रदर्शन विद्यार्थीनी प्रज्ञा मंद्रूपकर यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages